कोल्हार (प्रतिनिधी):- अति उष्णतेमुळे भगवतीमाता मंदिरा शेजारील डीपीने अचानक पेट घेतला. प्रवरेच्या अग्निशमन दलाच्या गाडीने सदर आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. सदर घटना सायंकाळी सातचे सुमारास घडली.
अति उष्णतेमुळे कोल्हार येथील भगवतीमाता मंदिरा शेजारील डीपीने घेतला अचानक पेट
बुधवारी सायंकाळी देवीची आरती सुरू होण्यापूर्वी भगवतीमाता मंदिरा शेजारील डीपी ने अचानक पेट घेतला. त्यात अवकाळीची हवा वेगाने वाहत असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळांनी आसमंत काळेभोर बनले होते. ऐन भावतीमातेच्या मंदिरात आरती सुरू होन्याची वेळ असल्याने सर्व ग्रामस्थ आग लागली त्या ठिकाणी धावले.
काही वेळातच महावितरणचे राजेंद्र डौले व कर्मचारी घटनास्थळी धावले. त्यानंतर डॉ विखे पाटील कारखान्याचा अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. थोड्या वेळातच सदर आगीवर त्यांनी नियंत्रण मिळवीत आग आटोक्यात आणली. सदर ठिकाणी नवीन डीपी दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच तत्परतेने लावण्यात आली. या दुर्घटनेत महावितरणचे अंदाजे एक लाखांचे नुकसान होऊ शकते असे महावितरणचे कर्मचारी राजेंद्र डौले यांनी सांगितले. सदर घटना लोकवस्तीमध्ये घडल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.



