spot_img
spot_img

दिलीप वळसे पाटील आता हाती तुतारी घेण्याची शक्यता?

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- आत्ताच राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे.

वळसे पाटील पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे मंत्रिमंडळ बैठकीला दांडी तर दुसरीकडे वळसे पाटील हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील आता हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वळसे पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यास हा अजित पवार आणि राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत आले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आत पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे, तसेच ते पुण्यात शरद पवार यांची देखील भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान यापूर्वी देखील शरद पवार यांनी अजित पवार यांना अनेक धक्के दिले आहेत. आता वळसे पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!