अस्तगाव (वार्ताहर):- जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी अस्तगाव च्या जगदंबा मातेचे यात्रे निमित्त देवीचे दर्शन घेतले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी अस्तगाव च्या जगदंबा मातेचे यात्रे निमित्त देवीचे दर्शन घेतले
देवीचे दर्शन घेतल्यानंतर बोलतांना सौ. विखे म्हणाल्या, देवीवरील भक्ती अतुट असुन देवीचे महात्म्य मोठे आहे. महिला अदिशक्ती जागृत करु शकतात. महिला या चांगले धार्मिक कार्य करु शकतात. महिला या अदिशक्तीचे रुप आहे. देवीच्या यात्रे निमित्त ग्रामस्थांनी चांगली तयारी केली आहे. यात्रे निमित्त आपण देवीकडे सर्वांना चांगले आरोग्य द्यावे, अशीच मागणी करु शकतो.
यावेळी सरपंच सौ. सविता संजय चोळके यांनी सौ. विखे यांचा सत्कार केला. याप्रसंगी जगदंबा मंदिर व सार्वजनिक देवालय उत्सव ट्रस्टचे अध्यक्ष वाल्मिकराव गोर्डे, उपसरपंच सुरेश जेजुरकर, सदस्या मनिषा मोरे, गणेश चे संचालक विजय गोर्डे, सौ. ज्योतीताई गोर्डे, माजी सरपंच नंदकुमार गव्हाणे, सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानदेव चोळके, ग्रामपंचायत सदस्य संतोष गोर्डे, ज्ञानदेव गोर्डे, नंदकुमार जेजुरकर, निवास त्रिभुवन, माजी सरपंच नवनाथ नळे, अशोकराव नळे, राजेंद्र तांबे, संजय परसराम चोळके, पवन आरंगळे, पंकज गोर्डे, प्रदिप चोळके, अनिल नळे,  माजी उपसरपंच रामनाथ चोळके, सनि चोळके, सुनिल चोळके, बाबुराव लोंढे, संजय आत्रे, राजेंद्र जेजुरकर, निलेश मोरे, भारत गोर्डे, सागर गोर्डे, दिलीप त्रिभुवन, सुंदर त्रिभुवन, रविंद्र जेजुरकर, दमयंतीताई शेजुळ,  पांडूरंग बिडवे, यांचेसह महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोफत पाणी!
ग्रामपंचायतीकडून  येणार्या यात्रेकरुंसाठी दोन दिवस नव्याने बसविण्यात आलेल्या फिल्टर चे मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या फिल्टर प्लँन्टचे उद्यघाटन सौ. विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती देतांना या प्लँन्टचे तंत्रज्ञ पंकज गोर्डे म्हणाले, ही योजना 15 वित्त आयोगातुन पंचायत समिती स्तर 2021-22 ताशी 1 हजार लिटर आरो प्लँन्ट व एटिएम सिस्टीम यात आहे, असे इंजिनिअर पंकज गोर्डे यांनी सांगितले. ग्रामपंचायतीने यात्रेकरुंसाठी मोफत पाण्याची सोय केल्याबद्दल सौ. विखे यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले. यावेळी यात्रेतील अविनाश जेजुरकर यांच्या साईफरसाण लाही सौ. विखे यांनी भेट दिली.




