25 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

सामायिक विहिरीच्या पाण्यावरून मारुती गाडीवान यांना पाच जणांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न ,

शेवगाव ( प्रतिनिधी ):-सामायिक शेतीच्या विहिरीतील पाणी का उपसले म्हणून रोहिदास भोसले सह पाच जणांनी लोखंडी गज व काठ्याने मारुती गाडीवान यास जबर मारहाण करून त्याचा हात फॅक्चर करुन आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने शेवगाव पोलिसात भोसलेसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील मौजे मुरमी येथील मारुती रंगनाथ गाडीवान वय 75 यांची मुरमी शिवारात शेती असून गट नंबर 40 मधील शेत जमिनीतील विहिरीत अर्धा हिस्सा म्हणून रोहिदास भीमराव भोसले यांना देण्यात आलेला असून चार दिवसाची दोघात पाण्याची बारी असते , दि .3 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मी व माझी पत्नी शारदा घरी जेवण करीत असताना आमचे गावातील अमोल रोहिदास भोसले , सोमनाथ रोहिदास भोसले ,रोहिदास भीमराव भोसले , भीमराव शामराव भोसले सर्व राहणार मुरमी येथील व रोहिदास भोसले यांचा मेहुनिचा मुलगा जालिंदर हे आमच्या घरात आले व म्हणाले, आमची पाण्याची बारी असताना तुम्ही विहिरीतील पाणी का उपसले , मी त्यांना म्हणालो की आजचा दिवस माझी बारी आहे , तुम्ही उद्यापासून विहिरीचे पाणी उपसा , असेच धंदा होऊन सांगत असताना अमोल रोहिदास भोसले आमची बरी असताना तू विहिरीचे पाणी उपसतो तुला आज दाखवतोच असे म्हणून त्याचे हातातील लोखंडी गजाने माझे डावी हाताच्या मनगटावर मारून मला दुखापत करून माझा हात फॅक्चर केला , त्यावेळी सोमनाथ रोहिदास भोसले यांनी लाकडी झाल्याने माझ्या पाठीत मारले , रोहिदास भोसले यांच्या मेहुणीचा मुलगा जालिंदर यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली त्यावेळी माझी पत्नी शारदा हि सोडवण्यासाठी आली असता रोहिदास भीमराव भोसले, भीमराव रामराव भोसले यांना ढकलून देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पुन्हा आमच्या नादाला लागल तर मारून टाकू अशी धमकी दिली घराजवळच शेतात राहत असलेले आमचा मुलगा मला व आमच्या पत्नीला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु हाताचे हाड फ्रॅक्चर झाल्याने पुढील उपचारासाठी अहमदनगरच्या सिविल हॉस्पिटल ला रेफर करण्यात आले असून मारुती गाडीवान यांच्या जबाबावरून शेवगाव पोलिसात वरील इसमाविरुद्ध 326 , 324 , 452 , 143 , 147 , 148 , 149 , 323 , 504 ,506 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,
 सामायिक विहिरीतील पाण्याच्या बारी वरून रोहिदास भोसले यांच्यासह पाच जणांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला परंतु मी हात मध्ये घातल्याने माझा जीव वाचला परंतु झाला असून देखील शेवगाव पोलिसांनी 307 चा गुन्हा दाखल केला नसून तो दाखल करावा अन्यथा मी कुटुंबासह अहमदनगरच्या जिल्हा पोलीस कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही मारुती गाडीवान यांनी दिला आहे , 
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!