7.3 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

नांदेडच्या तरुणाचा श्रीरामपूरमध्ये खून करणाऱ्या आरोपीला २४  तासात केले गजाआड, स्थानिक गुन्हा शाखेला आरोपीला पकडण्यात यश  

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर ते संगमनेर रोडवरील नांदुर ता. राहाता  येथील ग्रामपंचायत तळ्याजवळ रोडच्या कडेला असलेल्या गवतामध्ये एका पुरुष जातीचा बेवारस प्रेत पडलेले मिळुन आल्याने खळबळ उडाली होती त्या मयताच्या डोक्यावर तसेच मानेवर गंभीर दुखापती झालेल्या दिसुन आल्या होत्या मात्र मयताला कोणीतरी गंभीर दुखापती करुन त्याचा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले.

आजुबाजुच्या परिसरात मयताबाबत चौकशी करता त्याची ओळख पटून आली नव्हती. त्यामुळे तात्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला शहर पोलिसांनी घेतला असता यातील मयताचे नाव नितेश आदिनाथ मैलारे, वय 28 रा. पाखंडेवाडी, ता. मुखेड जि. नांदेड असे असल्याचे निष्पण झाले.त्यावरुन मयताचे वडील आदिनाथ मैलारे यांच्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गंभीर गुन्ह्याच्या आधारे शहर पोलिसांनी चौकशी अंती सखोल माहिती गोळा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शोखेचे व शहर पोलिसांचे चार पथके तयार करुन तात्काळ तपासकामी रवाना करण्यात आले

मयताचे नातेवाईक, मित्र इतर संबंधीत व्यक्ती यांच्याकडे सखोल चौकशी करून तांत्रीक माहितीचे विश्लेषण करुनही यातील मयताचा खून कोणी केला याबाबत कोणतीही उपयुक्त माहिती मिळुन येत नव्हती त्यामुळे तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त झाली की मयत नितेश मैलारे यांचा खून बाभळेश्वर परिसरातील पिकअप चालक ‘देवा’ याने केला आहेत.

सदर माहितीच्या आधारे पिकअप चालक देवा यांचा शोध घेत पोलीस पथकाने ऋषिकेश ऊर्फ देवा रेवनाथ बरवट, वय 25 धंदा- चालक, रा. केलवड खुर्द, ता. राहाता जि. अहमदनगर यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे सखोल विचारपूस केली त्याने मयत नितेश मैलारे याचा खून केल्याची कबुली दिली.यातील मयत नितेश हा वांळूज जि.छ. संभाजीनगर येथे एका कंपनीत काम करत होता. आरोपी ऋषिकेश ऊर्फ देवा रेवनाथ बरवट हा पिकअप चालक असुन तो दिनांक 02 ऑक्टोबर रोजी त्याचे मालकाची पिकअप गाडी घेवुन आर्णी जि. यवतमाळ येथे तुरीचे पोते पोहचविण्याकरीता गेला होता.दि. 03 ऑक्टोबर रोजी सकाळी तुर पोहचवल्यानंतर दुपारी तेथुन निघुन रात्री वांळुज जि.छ. संभाजीनगर येथे आला.

तेथे यातील मयत नितेश मैलारे याने त्याला पुणे येथे मित्राना भेटायला जायचे असल्याचे सांगुन आरोपी ऋषिकेश याचेकडे नेवासा फाट्यापर्यत लिफ्ट घेतली. प्रवासादरम्यान त्यांच्यात मैत्री होवुन ते रस्त्यात एका बारमध्ये दारु पिले. त्यानंतर मयत नितेश मैलारे यांने पुणे येथे जाण्याचे रद्द करुन तो आरोपी ऋषिकेश सोबत त्याचे पिकअप गाडीत शिर्डी येथे येण्यासाठी निघाला. त्यानंतर रस्त्यात ते दोघे पुन्हा दारु पिले व शिर्डीच्या दिशेने प्रवास करु लागले. मयत नितेश मैलारे याने शिल्लक राहिलेली दारूची बॉटल सोबत घेवुन पिकअप गाडीत ठेवली होती. श्रीरामपूर शहराच्या पुढे गेल्यानंतर दारुच्या नशेत त्या दोघांमध्ये पिकअप गाडीतच वाद होवुन शिवीगाळ व हाणामारी चालु झाली त्या रागात आरोपी ऋषिकेश बरवट याने गाडीतील लोखंडी जॅकने मयत नितेश मैलारे याचे डोक्यात मारला.

तसेच गाडीत ठेवलेली दारुची बॉटल फोडुन ती मयत नितेश याचे मानेजवळ खुपसली त्यात मयत नितेश गंभीर जखमी होवुन बेशुध्द झाला त्यामुळे आरोपी ऋषिकेश बरवट याने घाबरुन जावुन नांदुर शिवारात घटनास्थळी गाडी रोडच्या कडेला उभी करुन मयत नितेश याला गाडीतुन बाहेर झुडपात ढकलुन दिले व पिकअप घेवुन त्याचे घरी निघुन गेला अशी हकिगत आरोपी ऋषिकेश बरवट याने सांगुन गुन्हयाची कबुली दिली असुन गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे. श्रीरामपूर शहर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल तपास करुन नमुद खूनासारखा गंभीर गुन्हा कुठलेही धागेदोरे नसताना 24 तासाच्या आत उघडकीस आणला.

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!