लोणी (जनता आवाज वृत्तसेवा) :-प्रवरेच्या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून संस्कारक्षम शिक्षण देण्याबरोबरच भारतीय संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी सहकारातून समृद्धीकडे प्रवरा नवरात्र उत्सव हा आगळावेगळा पद्धतीने साजरा होत असून प्रवरेच्या या उत्सवातून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला जात असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या दुर्गापुर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्रवरा नवरात्र उत्सवानिमित्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी आयोजित केलेल्या दांडिया महोत्सव आणि देवीच्या आरती प्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी ट्रक संस्थेचे उपाध्यक्ष सुनील जाधव, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे, सरपंच नानासाहेब पुलाटे छगनराव पुलाटे, उपसरपंच नबाजी रोकडे हनुमंता रोकडे, मच्छिंद्र जाधव, मच्छिंद्र कानडे,कचरु जाधव, शांताराम पुलाटे,अंबादास पुलाटे, प्राचार्या संध्या रोकडे आदींसह शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या शिर्डी मतदारसंघांमध्ये जाती पातीचे राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन सर्व समावेशक विकास हा साधला जातो. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि स्वर्गीय डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी दिलेली संस्काराची शिदोरी पुढे नेण्याचं काम आज विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून होत आहे. भारतीय संस्कृती शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या दृष्टीने प्रवरा गणेशोत्सव आणि सध्या सुरू असलेला प्रवरा नवरात्र उत्सव हा सहकारातून समृद्धीकडे या माध्यमातून सहकारी चळवळीच्या माध्यमातून झालेला विकास आणि त्यातून त्यातून झालेले परिवर्तन याची नवी ओळख या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून नवदुर्गांचा जागर करत असतानाच महिलांचा सन्मान करा. अंधश्रद्धा बाजूला ठेवा.सर्वाना बरोबर घेऊन काम करा हा संदेश सौ. विखे पाटील यांनी दिला.
प्रारंभी प्राचार्य संध्या रोकडे यांनी शाळेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमाचे माहिती देत असताना शिक्षक पालक आणि विद्यार्थी यातूनच खरा आदर्श विद्यार्थी घडत असतो आणि यासाठी सर्वांचे योगदान हे मोलाचे ठरत असल्याचे सांगतानाच असेच योगदान सर्वांनी द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास वराडे यांनी तर आभार दादासाहेब पोटे यांनी मांडले