9.9 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

मोरजकर विरोधात मराठा समाज आक्रमक.. समाज बांधवांचा आंदोलनाचा इशारा… 

कुर्ला (जनता आवाज  वृत्तसेवा) :- माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ हून अधिक लोकांवर वेगवेगळ्या प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक खुलासा संभाजी ब्रिगेड संघटनेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केला होता. यानंतर प्रविणा मोरजकरांनी दाखल केलेले खोटे ॲट्रॉसिटीचे पुरावे देखील समोर आले होते. 

कुर्ल्यातील नेहरू नगर पोलिस स्टेशन मध्ये दोन मराठा समाजातील लोकांवर टाकलेल्या खोट्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे एफ.आय.आर. स्वरूपात समोर आल्यानंतर मोरजकरांचे मराठा समाजाला दिलेले आव्हान संपुष्टात आले. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका प्रविणा मोरजकरांच्या विरोधात स्थानिक मराठा समाजाने आणि अनेक मराठा संघटनांनी एकत्र येत कुर्ल्यातील मोक्याच्या परिसरात मोरजकर मराठा विरोधी असल्याचे बॅनर झळकवले.

ज्यामुळे मोरजकरांच्या विरोधात असलेला प्रचंड रोष आणि माध्यमांतून जाहीर करण्यात आलेल्या त्यांच्या उमेदवारीवर मराठा समाज धगधगताना दिसला.

संभाजी ब्रिगेड संघटना ही ठाकरेंच्या शिवसेनेसह युतीत आहे, परंतु मराठा समाजाला त्रास देणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली तर मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा आणि माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांच्या विरोधात काम करण्याचा सज्जड इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेने दिला आहे.

स्थानिक मराठा समाजासह इतर मराठा संघटनांनी बॅनरबाजीकरून आपला विरोध या आधीचं मोठ्या प्रमाणात दर्शवला आहे, मात्र जर मोरजकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर या सर्व मराठा संघटना आणि संपूर्ण मराठा समाज मोरजकर विरोधात आंदोलनात शामिल होतील आणि यावेळी बॅनरबाजीतूनच नाही तर रस्त्यावर उतरून जाहीर निषेध करतील, असे कुर्ल्यातील वातावरण आहे.

ठाकरेंची शिवसेना ही कुर्ल्यामध्ये अत्यंत प्रभावशाली दिसून येत आहे परंतु कुर्ल्यातील स्थानिक मराठा समाज, संभाजी ब्रिगेड व इतर मराठा संघटनेने माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर विरोधात दिलेली हाक ही ठाकरेंच्या शिवसेनेला बॅक फूटला टाकणारी आहे. मराठा समाजाने प्रविणा मोरजकर विरोधात दिलेला आंदोलनाचा इशारा हा आगामी कुर्ल्यातील निवडणुकीचे वारे बदलू शकतो.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!