spot_img
spot_img

श्रीरामपुरात अवैध दारू वाहतूक करणारे पकडले  

श्रीरामपूर( जनता आवाज  वृत्तसेवा ):-शहरातील श्रीरामपूर-पुणतांबा रोडवरील पाटाच्या पुलाजवळ अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकासह श्रीरामपूर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोन कार पकडून मोठी कारवाई केली आहे. शहरातील पुणतांबा रोडवर पाटाच्या पुलाजवळ मंगळवारी सकाळी देशी विदेशी दारुनी भरलेली चॉकलेटी रंगाची अल्टो कार पकडली तसेच त्या मागून येणाऱ्या देशी-विदेशी दारूने भरलेली पांढऱ्या रंगाची अल्टो कार देखील पकडली.

पोलिसांनी या दोन्ही कारमधील देशी भिंगरी संत्रा, रॉयल चॅलेंज ब्लू व्हिस्की, ओल्ड मंक रम, इम्पेरियल ब्लू व्हिस्की, ऑफिसर चॉईस ब्लू व्हिस्की, रॉयल स्टॅग व्हिस्की, मॅकडॉल नंबर वन व्हिस्की, डीएसपी ब्लॅक व्हिस्की, किंगफिशर बियर, टू वर्ग बियर आशा विविध प्रकारच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करत दोन्ही अल्टो कार ताब्यात घेत एकूण ५,४३,५५०/- रु. किं.चा मुददेमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी देशी-विदेशी दारूची वाहतुक करणाऱ्या चरणलाल मुरारीलाल राजपाल वय ५६ वर्ष रा. राजपाल निवास तांबे चाळ वॉर्ड नं. १ श्रीरामपूर व किशोर पावलस तांबे (वय ४७ ) रा. इंदिरानगर शिरसगाव शिवार ता. श्रीरामपूर या

दोघा आरोपींविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला पो हे कॉ.शंकर संपत चौधरी यांच्या फिर्यादीवरुन गुरनं ९९८/२०२४ म.प्रोव्हि.का. कलम ६५ (अ) (ई),८३ मो.वा.का. कलम ४, १४६/१९६, १८१, १९२/१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला पोलीस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.नितीन देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील सपोनि. एकनाथ ढोबळे, पोहेकॉ. शंकर चौधरी, पोहेकों. संतोष दरेकर, पोना.रामेश्वर वेताळ, पोना.काकासाहेब मोरे तसेच श्रीरामपूर शहर पो.स्टे. चे पोसई. समाधान सोळंके, पोसई.दिपक मेढे, पोसई.रोहिदास ठोंबरे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. शरद आहिरे हे करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!