spot_img
spot_img

बसला आग.. त्या घटनेची आठवण..

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर खाजगी बसला अचानक आग लागली. ही घटना पहाटे ५ च्या सुमारास घडलेली आहे. सुदैवाने बसमधील १५ प्रवासी बचावले आहेत.

या आगीत बस जळून खाक झाली आहे.पुण्याहून जामोदकडे निघालेल्या खासगी बसला नेवासा तालुक्यातील खडका टोल नाका येथे आग लागली. प्राथमिक माहितीनुसार बसचा टायर फुटल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांचेसह पोलिस घटनास्थळी पोचले आहेत. बसमधील सर्व प्रवासी खाली उतरवले आहे.

वाहतूक सुरळीत चालू केली असल्याची माहिती जाधव यांनी दिली. तसेच भेंडा येथील लोकनेते मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दल पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

खडका फाटा येथे घडलेल्या एसटी अपघात घडला होता. त्या घटनेत काही प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या आठवणी सर्वांसमोर उभ्या राहिल्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!