spot_img
spot_img

आ. संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर होताच मार्केट यार्ड चौकात कार्यकर्त्यांचा जल्लोष आ. संग्राम जगताप यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष शहर विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले – मा. नगरसेवक प्रकाश भागानगरे

नगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- आ. संग्राम जगताप यांनी गेल्या १० वर्षापूर्वी शहरी विकासाचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नगरकरांनी त्यांच्यावर विश्वास टाकत दोनदा आमदार म्हणून निवडून दिले आणि त्यांनी मेहनत घेत प्रामाणिकपणे शहराचा विकास कामातून चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मार्केट यार्ड चौक येथे फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला असल्याची माहिती माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी दिली     

आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर होतात मार्केट यार्ड चौकात कार्यकर्त्यांचा जल्लोष करण्यात आला यावेळी प्रा माणिक विधाते, प्रा. अरविंद शिंदे सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे,माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, मंगेश खताळ, धर्मा करांडे,  विष्णू कलागते, पंकज टोपले, विश्वास जोमीवाळ, लकी खूबचंदानी, बापुसाहेब ओहोळ, अक्षय कांडेकर, जाय लोखंडे, रोहन शिरसाठ, सागर गुंजाळ, अंकुश मोहिते, दत्ता खैरे, मयूर राऊत आदी उपस्थित होते. तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!