नेवासा फाटा (प्रतिनिधी ) :-नामदेव फोपसे यांची पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी म्हणून निवड. नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील शेतकरी कुटुंबातील नामदेव फोपसे यांची पंजाब नॅशनल बँकमध्ये राष्ट्रीय लेव्हलवर झालेल्या परीक्षेमध्ये यश संपादन केले. अतिशय स्पर्धा असलेल्या बँकेमध्ये त्यांनी यश मिळविले . याबद्दल त्यांचा तालुक्यातील मक्तापूर येथे माझे मित्र परिवाराकडून सन्मान करण, त्यांची निवड झाल्या बद्दल ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पा कांगुणे व मक्तापुरचे विद्यमान सरपंच अनिलराव पा लहारे लक्ष्मणराव पा बर्डे व मक्तापुरचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, संभाजी बर्डे, शिवाजी बर्डे, यांचे सह आता पुढचे ग्रामस्थ उपस्थित होते.




