5.8 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, सलीम शेख, मोहम्मद शेख, माजी नगरसेवक राजेश अलघ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, सलीम शेख, मोहम्मद शेख तसेच माजी नगरसेवक राजेश अलघ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे श्रीरामपूर शहरात काँग्रेस पक्षाला खिंडार पडले असून राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे उमेदवार आ. लहू कानडे यांना फायदा होणार आहे.

माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, सलीम शेख, मोहम्मद शेख, माजी नगरसेवक राजेश अलघ, तसेच अशोक बँकेचे संचालक महाराज कंत्रोड, जय मातादी पतसंस्थेचे संचालक अनिल (बंटी) गुप्ता, कमालपुर गुरुद्वाराचे विश्वस्त भगवंतसिंग बत्रा, प्रशांत अलघ, सचिन गुलाटी, नीरज त्रिपाठी, गणेश वर्मा, राकेश सहानी, बंटी थापर, चेतन जग्गी, प्रदीप गुप्ता, नामदेव अस्वर, नासिर शेख, गणेश गायकवाड, मदन कणगरे, सुनील परदेशी, रोहित गुलदगड, प्रशांत यादव, अशोक गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उद्योजक अंकुश कानडे, अमृत काका धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अँड. जयंत चौधरी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

माजी उपनगराध्यक्ष श्री. गुलाटी, श्री. शेख, माजी नगरसेवक श्री. अलघ यांच्यासह कार्यकर्ते गेली 30 ते 35 वर्षापासून काँग्रेसमध्ये होते. सुरुवातीच्या काळात माजी आमदार स्व. जयंत ससाणे त्यांच्या गटासोबत त्यांनी काम केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार लहू कानडे विजय झाल्यानंतर त्यांनी यांच्यासोबत काँग्रेसमध्ये काम केले. आ. कानडे यांनी आमदारकीच्या काळात मतदार संघात कोट्यावधी रुपयांची कामे करून मतदार संघामध्ये कॉंग्रेस पक्ष वाढीचे मोठे काम केले. असे असताना कॉंग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्यासोबत त्यांची काल सायंकाळी हरेगाव येथे चर्चा झाली. त्यानंतर आज सर्व जणांनी बारामती येथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे शहरात काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे दिसून येत आहे. तसेच या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांना त्याचा मोठा लाभ मिळणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!