आश्वी दि.५ (प्रतिनिधी):-प्रत्येकाच्या पोटाला अन्न आणि शुद्ध पाणी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काम करत आहेत. मोफत धान्य, मध्यान्ह भोजनासह व्यक्तिगत लाभाच्या योजनेतून सर्व सामान्यांना आधार दिला जात आहे. पारदर्शक आणि विकासाभिमुख कामामुळे केंद्र आणि राज्यातील सरकार सर्वसामान्य जनतेचे ठरले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
मोफत धान्य, मध्यान्ह भोजनासह व्यक्तिगत लाभाच्या योजनेतून सर्व सामान्यांना आधार-जि प मा.अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील
राज्य सरकारच्या वतीने गुढी पाडवा ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिना पर्यत आनंदाचा शिधा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय करण्यात आला.संगमनेर तालुक्यातील प्रतापपुर येथे आनंदाच्या शिधा वाटपाची सुरूवात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनी विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ट्रक सोसायटीचे माजी संचालक भगवानराव इलग, रंगनाथ आंधळे, सेवा संस्थेचे अध्यक्ष गजानन आंधळे, उपाध्यक्ष आंधळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब सांगळे, सरपंच दत्ताञय आंधळे, उपसरपंच शोभा आंधळे, पुरवठा अधिकारी भालेराव, प्रभाकर आंधळे, रामदास गिते, सुखदेव आंधळे, सुरेशराव इलग, बाळासाहेब आंधळे,हरीभाऊ आंधळे आदीसह लाभार्थी उपस्थित होते.
आपल्या भाषणात सौ. विखे पाटील म्हणल्या की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गोरगरीब जनतेच्या हितासाठी वैयक्तीक लाभाच्या योजनांचे मह वयोवृध्द नागरीकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले.राष्ट्रीय वयोश्री योजना, मोफत धान्य, कोविड काळात जनतेला दिलेला विश्वास आणि मोफत लसीकरण यामुळे सर्वानाच मोठा आधार मिळाला.
राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या हिताचे निर्णय होत आहे.मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्री म्हणून काम करतांना वेगवेगळे दाखले एकाच अर्जावर देण्याचा निर्णय करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. वाळूचे धोरण घेवून अवैध वाळू व्यवसायाला लगाम घातला असल्याकडे लक्ष वेधून, ग्रामीण भागातील पुर्वीची दशहत आता कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतांना विविध योजनांची अंमलबजावणी पारदर्शक पणे सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक भाषणात बोलताना भगवान इलग यांनी शिर्डी मतदार संघातील विकास कामे वैयक्तीक योजना यामुळे शिर्डी मतदार संघ राज्यात विकासात अव्वल ठरला असल्याचे सांगितले. सुत्रसंचालन बाळासाहेब इलग यांनी तर आभार गजानन आव्हाड यांनी मानले.




