लोणी ( प्रतिनिधी):-शिर्डी मतदारसंघातील लोहगाव येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजने चे भूमिपूजन तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ व आनंदाचा शिधा चे वाटप जि.प.माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जि प माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते लोहगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न.. जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजने चे भूमिपूजन व लाभार्थ्यांना शिधा वाटप
याप्रसंगी जि. प.माजी सदस्यां कविता लहारे, माजी सभापती नंदा तांबे,माजी उपसभापती बबलू म्हस्के, माजी सरपंच स्मिता चेचरे,राजेंद्र चेचरे,गणेश चेचरे, हभप संदीप महाराज चेचरे,सरपंच शशिकांत पठारे,माजी संचालक लहानु चेचरे, उपसरपंच दौलत चेचरे,माजी संचालक केरुनाथ चेचरे,तंटामुक्त अध्यक्ष शांताराम चेचरे, किशोर गिरमे, माजी संचालक भाऊसाहेब चेचरे,माजी उपसरपंच सुरेश चेचरे,अभियंता गुंजाळ,सुमित घोरपडे शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता वााघमारे यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सद्स्य ,ग्रामस्थ,पदाधिकारी ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच जि प प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन जि प माजी अध्यक्षा सौ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.




