13 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

केडगावमध्ये आ.संग्राम जगताप यांनी केलेल्या विकासकामांची परतफेड मताधिक्याने केडगावकर करणार : माजी नगरसेवक सुनीलमामा कोतकर केडगाव मधील प्रचार फेरीस मोठा प्रतिसाद

नगर (जनता आवाज वृत्तसेवा):- महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांचे केडगावमध्ये जोरदार स्वागत झाले आहे. केडगावचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अरुण्काकाका जागताप, आ.संग्राम जगताप हे केडगावच्या विकासासाठी मोठे योगदान देत सर्व नागरिकांच्या पाठीशी उभे असतात. आम्हीपण गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत लीड देवून त्यांनी केलेल्या कामांची परतफेड करत आहोत. याही निवडणुकीत त्यांना केडगाव मधून मोठा लीड देवून त्यांच्या विजयात वाटा उचलणार आहोत, असे प्रतिपादन माजी नगरसेवक सुनीलमामा कोतकर यांनी केले.

अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सकाळी केडगाव उपनगरात प्रचार फेरी काढून नागरिकांच्या भेटी घेतल्या. केडगाव वेशीजवळ उमेदवार आ.जगताप यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आlले. यावेळी माजी नगरसेवक सुनीलमामा कोतकर, मनोज कोतकर, महेंद्र कांबळे, गणेश ननावरे, राहुल कांबळे, सुनील कोतकर, जालिंदर कोतकर, संजय लोंढे, पोपट कराळे, महेश गुंड, भाजपाचे पंकज जहागीरदार, धनंजय जामगावकर, शरद ठुबे आदींसह मोठ्या संख्यने परिसरातील नागरिक व महायुतीतील पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उमेदवार आ.संग्राम जगताप म्हणाले, केडगाव उपनगरात सर्व जनतेने माझे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. केडगाव भागात झालेल्या विकास कामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच याभागातून नागरिकांचे मोठे समर्थन मला मिळत आहे. याबद्दल मी केडगावकरांचे आभार मानतो. नगरमध्ये चांगल्या वातावरणात ही विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी असाच उत्स्फूर्तपणा कायम ठेवत येत्या २० नोव्हेंबरला आपला बहुमोल वेळ माझ्यासाठी देवून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

माजी नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले, आ.संग्राम जगताप यांनी केडगावमध्ये खूप विकासकामे केली आहेत. यामध्ये अनेक वर्षांपासून रखडलेला अंबिकानगर ते शाहूनगर रस्त्याचे काम त्यांनी पूर्ण केले आहे. लिंक रोड ते झेंडा चौक रस्त्याचे काम पूर्णत्वास आहे. भूषणनगर ते कल्याणरोड या प्रमुख रस्त्यांचे कामांसह प्रभाग १६ व १७ मधील सर्व अंतर्गत रस्त्यांची कामे आ.जगताप यांनी मार्गी लावली आहेत. केडगाव मधील अनेक मंदिरांसाठी आ.जगताप यांनी निधी देवून सभागृह व सुशोभीकरणाची कामे केली आहेत. देवी रोडवरील ओढ्याच्या पुलाचे कामही पूर्ण झाले आहे. आबाल वृद्धांसाठी उद्याने उभारली आहेत. महिलांसाठी अद्यावत जिम त्यांनी दिली आहे. असे बरेच महत्वाची व प्रलंबित कामे आ.संग्राम जगताप मार्गी लावून केडगावच्या विकासात मोलाची भर घातली आहे. त्यामुळे त्यांच्यावर येथील जनता खुश आहे. या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चीत असून केडगाव मधून त्यांना मोठे मताधिक्य मिळणार आहे.

या वेळी महेंद्र उपाध्ये महेश सरोदे सतीश कोतकर माजी नगरसेवक सुनील काकडे अजित कोतकर, भरत ठुबे, बहिरु कोतकर, कृष्णा लोंढे, संतोष गाडे, बाळासाहेब पठारे, सुरेश कोतकर, धोंडीराम पठारे, राजू कोतकर, सुजय मोहिते, योगेश कोतकर, नितीन गुंड, दीपक गिरे, सचिन पवार, किशोर जेजुरकर आदींसह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!