नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा ):- तालुक्यात रोजगाराच्या संधी नसल्याने तरुण वर्गाला बाहेर कामासाठी जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन आपण तालुक्यातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा प्रहारचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.
बाळासाहेब मुरकुटे यांचा तालुक्यातील गावा-गवात रॅली काढून मतदारांशी संवाद साधला जात आहे. या संवादादरम्यान, तरुणांनी मुरकुटे यांना पाठिंबा मोठ्या प्रमाणात देत असून रोजगाराचा प्रश्न मांडत आहेत. हा प्रश्न आपण आगामी काळात सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन तरुणांकडून मुरकुटे यांना केले जात आहे. हा प्रश्न आमदारांसमोर अनेकदा मांडूनही त्यांनी सोडविलेला नाही. त्यामुळे हा प्रश्न आपण सोडवाल, अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण प्राधान्यायने सोडावा, असे आवाहन तरुणांनी मुरकुटे यांना केलेले आहे.
तरुणांच्या आवाहनाला मुरकुटे यांनी साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमदार झाल्यानंतर तालुक्यातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी तरुणांना दिलेले आहे. तालुक्यात रोजगार निर्मिती होण्यासाठी एमआयडी मंजूर करून येथे मोठे उद्योग-धंदे आणण्यासाठी प्राधान्य देऊन त्यासाठी वेळ पडली तर आंदोलने उभारून तालुक्यातील तरुणांचा रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावू, असे आश्वासन या वेळी मुरकुटे यांनी तरुणांना दिलेले आहे. या आश्वासनामुळे तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे. तरुण वर्ग सध्या मुरकुटे यांच्या प्रचारात सक्रीय सहभागी होत आहे.