spot_img
spot_img

मुरकुटे यांच्या प्रचार रॅलीला नेवाशातील गावा-गावात उदंड प्रतिसाद

नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा ):- प्रहराचे पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचार रॅलीला नेवाशातील गावा-गावात उदंड प्रतिसाद मिळत आहे.

नेवाशासह साईनाथ नगर, पुनतगाव, पाचेगाव, इमामपूर शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मुरकुटे यांचा शनिशिंगणापूरमधून दौरा सुरु होणार आहे. त्यानंतर सोनई, वंजारवाडी, बेल्हेकरवाडी, राजळेवाडी, खेडले परमानंद, शिरेगाव  शनिशिंगणापूर, सोनई येथे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा झंजावत दौरा झाला. यामध्ये महायुतीसह महाविकास आघाडीतील नाराज मंडळींनी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे.

नेवाशाच्या विकासासाठी जयहरी पुन्हा नारा दिला. या नाऱ्याने सोनई परिसर दणाणून गेला होता. या रॅलीच्या वेळी अनेकांनी मुरकुटे यांचा सत्कार करत आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा शब्द दिला.

त्यानंतर रविवारी नेवासा, साईनाथनगर, पुनतगाव, इमामपूर,गोनेगाव, निंभारी, अंमळनेर, करजगाव, वाटापूर, तामसवाडी या गावांना मुरकुटे यांनी भेटी दिलेल्या आहेत. या भेटी दरम्यान विविध गावातील तरुणांसह अबालवृध्दींनी विश्वास जुना… जयहरी पुन्हा हाच नारा दिलेला आहे.

या नाऱ्याचा गजर आज दिवसभर वरील गावांध्ये सुरु होता. तालुक्यातील प्रत्येक गावात सध्या जय हरी यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास उंचावत चालला आहे. दिवसेंदिवस जयहरी यांच्या गोटात कार्यकर्त्यांची मोठी फौज दिसून येत आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!