spot_img
spot_img

हॉटेलमध्ये गॅस टाकीला भीषण आग; नगरपरिषदेच्या अग्निशमन सुविधांबाबत प्रश्नचिन्ह

शेवगाव( जनता आवाज वृत्तसेवा ):-शेवगाव शहरातील नित्यसेवा हॉस्पिटलसमोरील एका हॉटेलजवळ ठेवलेल्या गॅस टाकीला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गॅस टाकीतील गळतीमुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. आग लागल्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, शेवगाव नगरपरिषदेकडे अग्निशमन वाहन उपलब्ध असतानाही आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक सुविधा व तत्काळ प्रतिसाद मिळत नसल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शहरात अशा प्रकारच्या घटना घडत असताना अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात अशा दुर्घटनेत मोठी हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. संबंधित प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!