spot_img
spot_img

लोणी येथे गोडाऊनला आग! आगीत सर्व साहित्य जळून खाक

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- लोणी येथे बाळासाहेबनगर भागातील दिवटे  यांच्या मालकीचे द्रोण व पत्रवाळीचे गोडाऊनला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास  भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण गोडाऊन मधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. 

 आज पाचच्या सुमारास  भाऊसाहेब पाटील पेट्रोल पंपा मागील भागात असलेल्या दिवटे  यांच्या मालकीच्या गोडाऊनला भीषण आग लागली. ही आग लागल्याचं लक्षात येताच परिसरातील लोकांनी अग्निशामक व पोलीस प्रशासनाला त्वरित संपर्क केला.  परंतु आगीचे प्रमाण जास्त असल्यामुळे अग्निशामक यांच्या आधीच गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. 

ही आग कशामुळे लागली ही अद्यापही समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!