spot_img
spot_img

शिर्डीत महिलाच्या मंगळसूत्र चोरीचा छडा तब्बल ५ लाख ७२ हजार रुपये किमतीचे ४४ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- शिर्डीत महिला भाविकांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने चोरणाऱ्या आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला असून, दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत तब्बल ५ लाख ७२ हजार रुपये किमतीचे ४४ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 

दि. १८ सप्टें. रोजी रात्री शिर्डी बसस्थानकाकडे जात असताना आंध्र प्रदेशातील ५६ वर्षीय महिला भाविकेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन अज्ञात आरोपींनी जबरीने चोरून नेले होते. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मक्का यांनी मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित लखन विजय काळे (वय २३, रा. शेवगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

तपासादरम्यान आरोपीने आपल्या साथीदारांसह यापूर्वी शेवगाव परिसरात शेतात काम करणाऱ्या महिलेचे सोन्याचे दागिने जबरीने चोरल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे शेवगाव पोलिसांनी आणखी एका चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.

पोलिसांनी सोनाराकडून ५ लाख २० हजार रुपये किमतीचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५२ हजार रुपये किमतीची ४ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, असा एकूण ५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला. आरोपीला मुद्देमालासह शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे असल्याचे निदर्शनात आलेले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन विजय काळे याच्याविरुद्ध पाथर्डी, शेवगाव आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत.

या कारवाईत सहभागी पथक म्हणून पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पवार, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब खेडकर, फरुकान शेख, प्रशांत राठोड व महादेव भांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!