spot_img
spot_img

ममदापूरजवळ गोमांस आणि गाय वासरांच्या मुंडके, हाडांचा खच, हिंदू संघटनातर्फे तीव्र निषेध  

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालुक्याच्या जवळ असणाऱ्या ममदापूरजवळील यादवमळा परिसरात गोवंश जातीच्या गायांचे मुंडके, हाडं असलेल्या पिशव्या, गोण्यांचा खच आढळून आला आहे.

यावरून ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असून मोठ्या प्रमाणावर ममदापूर परिसरात गोवंश जनावरांची हत्या होत असल्याचे या मांसाच्या आणि हाडांच्या खचावरून स्पष्ट होत आहे. कोणीतरी अज्ञात लोकांनी हे गायांचे रक्ताने माखलेले मुंडके, मांस, हाडं त्यांच्या भरलेल्या पिशव्या एका ठिकाणी आणून टाकल्या. हे निदर्शनास आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंदूत्ववादी कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले.

शिवप्रहार प्रतिष्ठाणचे प्रमुख माजी पीएसआय. सूरज आगे यांना या ठिकाणाहून फोन आल्यानंतर त्यांनी भेट दिली असता नागरीकांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त केल्या. मोठ्या प्रमाणावर या परिसरात सुरू असलेले कत्तलखाने तातडीने बंद झाले पाहीजे. अनेकदा मागणी करूनही थातूरमातूर कारवाई होताना दिसते. परंतु, मोठी कारवाई होत नसल्याने कत्तलखाने सुरू दिसतात. त्यामुळे तातडीने प्रशासनाने या ठिकाणचे कत्तलखाने बंद करून कारवाई करावी अन्यथा या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा मोठा उद्रेक होण्याची भिती यावेळी सूरज आगे यांनी व्यक्त केली.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!