spot_img
spot_img

श्रीरामपूर शहराजवळील सुभाषवाडीमध्ये बिबट्याचा हल्ला, चार जण जखमी

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर शहराजवळ असलेल्या सुभाषवाडी परिसरामध्ये एका बिबट्याने आज दि.२७ नोव्हेंबर रोजी बुधवारी सायंकाळच्या सुमारास संदीप भोसले नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला. यामध्ये या व्यक्तीच्या पायाला चावा घेतल्याने जखम झाली आहे.

तसेच या बिबट्याने एका लहान मुलावर देखील हल्ला करत त्याला नख मारले त्याचबरोबर त्यांच्या पत्नीवर देखील हल्ला केला आहे . ही घटना श्रीरामपूर शहराजवळील विद्यानिकेतन शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सुभाषवाडी येथे घडली आहे.

याच वेळी थोड्या अंतरावर असलेली नवलेवस्ती जवळील नवले यांच्या मुलीवर पण बिबट्याने हल्ला केला आहे. त्यामुळे सुभाषवाडी व नवलेवस्ती जवळील परिसरात मोठे घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!