9.9 C
New York
Thursday, November 28, 2024

Buy now

spot_img
spot_img

एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे मांडले ४ प्रस्ताव, अशी सूत्रांची माहिती

नवी दिल्ली (जनता आवाज वृत्तसेवा):-एकनाथ शिंदे यानी अमित शाह यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडून अमित शाह यांच्याकडे मांडण्यात आले ४ प्रस्ताव देण्यात आले आहे.

प्रस्ताव 1

मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे ठेवणार असाल तर शिवसेनेकडे आधी असलेली खाती तशीच ठेवा

प्रस्ताव २

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देणार नसाल तर शिवसेनेला त्यांच्या कोट्यापेक्षा अधिकची ५ महत्त्वाची खाती द्यावी

प्रस्ताव ३

शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असतील तर गृहमंत्री किंवा अर्थमंत्री द्यावे.

प्रस्ताव ४

शिवसेनेकडून अन्य कुणी उपमुख्यमंत्री होणार असेल तर त्यांना गृहमंत्री आणि अर्थमंत्री भाजपकडून देणार नसाल. तर इतर खाती वाढवून द्यावी. ४ ते ५ खाती वाढवून द्यावी.

दिल्लीत सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. दीड तासभर दोन्ही नेत्यांची बैठक झाली. सुनिल तटकरे यांच्या घरी चालली दीड तास बैठक चालली होती. महायुतीच्या बैठकी अगोदर दोन्ही नेत्यांची दिल्लीत बैठक झाली.

तर दुसरीकडे, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आहे. तासभर ही बैठक पार पडली. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी बैठक आटोपून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले.

दिल्लीत पोहोचल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “महायुतीच्या मुख्यमंत्र्यांबाबत कोणताही अडथळा नसल्याची मी काल पत्रकार परिषदेत माझी भूमिका स्पष्ट केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!