7 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

राहाता तहसील कार्यालयात मुख्य शासकीय राष्ट्र ध्वजवंदन सोहळा संपन्न देशाची पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकासाकडे वाटचाल – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर

शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा): – भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राहाता तहसील कार्यालयात आयोजित राष्ट्र ध्वजवंदन सोहळ्यात शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजवंदन केले. देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळात अनेक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. अनेक लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून नागरिकांची काळजी घेण्यात येत असून देश विकासाकडे वाटचाल करत आहे”, असे श्री. कोळेकर यावेळी म्हणाले.

यावेळी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, राहाता तहसीलदार अमोल मोरे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, नवनाथ लांडगे, बाळासाहेब मुळे, सुधाकर ओहोळ, राहाता नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव लोंढे, उपअभियंता के.बी.गुंजाळ, कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, भूमी अभिलेख उपअधीक्षक योगेश थोरात, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत श्री.कोळेकर म्हणाले, अन्नसुरक्षा, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत, हर घर जल यांसारख्या योजनांच्या माध्यमातून देशातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यात येत आहेत. अहिल्यानगर- मनमाड रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास मंजूरी मिळाली आहे. सावळीविहीर येथे एमआयडीसीच्या कामास सुरुवात झाली आहे. पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. शिर्डीत साईबाबांच्या जीवनमानावर आधारित थीम पार्कच्या कामास मंजुरी मिळाली आहे. साई संस्थानच्या माध्यमातून अद्यावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साकारणार आहे. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे काम सुरू असून या इमारतीच एक हजार प्रेक्षक क्षमतेचे प्रेक्षागृह साकारणार होणार आहे. या विकास कामांमुळे शिर्डी व परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी श्री.कोळेकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ॲग्रीस्टॅक योजनेत सहभागी शेतकरी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मंगल सुभाष वाघमारे, अरुण रावसाहेब बोर्डे, सदगिर पांडुरंग दिनकर यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी राहाता पोलीस कर्मचारी पथक, शारदा आणि डांगे विद्यालयाच्या भारत स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी परेड संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

कार्यक्रमानंतर अपर जिल्हाधिकारी श्री. कोळेकर यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!