लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त शिक्षणांबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना आणि खेळायलाही महत्त्व दिले दिले पाहिजे. पालकांनी देखील यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. चालक-मालक ,शिक्षक, पालक विद्यार्थी हे एकत्र आल्याशिवाय आदर्श विद्यार्थी घडणार नाही यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरजआहे. पालकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कला अध्यापक संघाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ललित कला स्पर्धा २०२४अंतर्गत चित्रकला, हस्ताक्षर आणि रंगभरण स्पर्धेचा पारितोषिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी सौ विखे पाटील बोलत होत्या यावेळी संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, प्राचार्य सर्वश्री डॉ. बी.बी.अंबाडे, सौ रेखा रत्नपारखी, सौ भारती कुमकर, सौ सीमा बढे, प्रवरा कला अध्यापक संघाचे अध्यक्ष एम.डी.जरे , उपाध्यक्ष आर. टी. चासकर, खजिनदार जी.पी. बोरा, सचिव एस.बी. मोरे, राजेंद्र तुपे,संतोष पुलाटे विविध शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य बक्षीस पात्र विद्यार्थी पालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ विखे पाटील म्हणाल्या की पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या जिल्हास्तरीय ललित कला स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशाच आहेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यामुळे प्रोत्साहन मिळते हस्ताक्षर स्पर्धा आणि त्या माध्यमातून मिळणारे प्रोत्साहन हे महत्त्वपूर्ण असेच असते. जो विद्यार्थी शिक्षणामध्ये मागे आहे तो विद्यार्थी आपल्या छंदातून पुढे जाऊ शकतो. आपला व्यवसाय करून या व्यवसायातून आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो यासाठी हे व्यासपीठ महत्वपूर्ण असल्याचे सौ विखे पाटील यांनी सांगतानाच पालकांनी देखील आपल्या मुलांना शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना आणि छंदांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली.
आज स्पर्धा वाढत आहे या स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी आणि सक्षमरित्या उभा राहण्याच्या दृष्टीने प्रत्येकानच जागृत पालक होण्याची गरज असल्याचे सांगतानाच शिक्षक पालक विद्यार्थी आणि संस्था चालक यांनी एकत्रित काम करून या स्पर्धेच्या युगात आव्हानांना सामोरे जाणारा विद्यार्थी घडवण्याचं काम करावे असेही सौ विखे पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी प्रवरा अध्यापक संघाचे अध्यक्ष एम.डी.जरे यांनी प्रास्ताविकामध्ये स्पर्धेचा आढावा घेत असताना २०१९ पासून या स्पर्धा सुरू आहेत याची व्याप्ती आता वाढत असून जिल्ह्यातील २३ हजार ६५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर आहेर, आर.टी. चासकर, के.बी. को-हाळे यांनी तर आभार जी.पी. बोरा यांनी मांनले.