संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यात जसे सर्वसामान्य जनतेने परिवर्तन करून सर्वसामान्य शिव सैनिक असणाऱ्या एका शेतकऱ्यांच्या मुलाला या तालुक्याचा आ केले असेच परिवर्त जिल्हापरिषद पंचायत आणि संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत करून संगमनेर नगरपालिकेवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकवायचा आहे.त्या साठी सर्व शिवसैनिकांनी आपापले मत भेद बाजूला करून कामाला लागा असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी सर्व शिवसैनिकांना दिला.
संगमनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सौरभ राजेंद्र देशमुख,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे समीर ओझा व विद्यार्थी काँग्रेसचे ओंकार राऊत यांच्यासह शहर व तालुक्यातील असंख्य युवक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेशकेला त्यावेळी हॉटेल पंचवटीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आ खाताळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रमेश काळे, दादाभाऊ गुंजाळ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
आ.खताळ म्हणाले की उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे व खा श्रीकांत शिंदे यांच्यामार्गदर्शना खाली संपूर्ण राज्यामध्ये शिवसेनेची सभासद नोंदणी सुरू झालेली आहे. गावागावात शिवसेना अन घराघरात शिवसैनिक या द्वारे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यात सर्वात जास्त शिव सेनेची नोंदणी झाली पाहिजे.यासाठी सर्वच शिवसैनिकांनी कामाला लागावे आपण आज जरी सत्तेत असलो तरी कोणावरही अन्याय होणार नाही. याची प्रत्येक शिवसैनिकांनी काळजी घेतली पाहिजे.कुठलेही आंदोलनकरताना अगर पक्षाबाबत निर्णय घेताना पक्षाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येक शिवसैनिकाला बंधनकारक राहणार आहे.भविष्यात तुमच्यासर्वांवरच पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदार्या टाकल्या जाईल. मात्र जबाबदार्या सांभाळताना प्रत्येकाने आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून पक्षासाठी काम करावे. पूर्वीच्या काळी संगमनेरमध्ये शिवसेनेचे काम सुरू होते.परंतु आता आपला हक्काचा शिव सेनेचा आमदार झाला आहे. हा झालेला विजय काहीजणांना पाहवत नाही.म्हणून काही विकृत बुद्धीचे लोक आपल्याच लोकांना हाताशी धरून आपल्यातच फूट पाडण्याचे काम करत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून ज्या जनतेने आपल्याला विश्वासाने काम करण्याची संधी दिली आहे त्यांची कामे करायची आहेत असा ही सल्ला आ खताळ यांनी उपस्थित शिव सैनिकांना दिला
माझ्यासारखा सर्वसामान्य शिवसैनिक या तालुक्याचा आमदार होऊ शकतो तर आगामी निवडणुकीमध्ये तुमच्या तीलच एखादातृब या नगरपालिकेचा नगराध्यक्ष नगरसेवक किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य होऊ शकतो संगमनेर तालुक्यासाठी कुठले प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे त्यामुळे तुम्ही निधी बाबत अजिबात काळजी करू नका
शिवसेना पक्षाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्या च्या शिवसेनेची सर्वस्वी जबाबदारीनेवासा विधानसभेचे आमदार विठ्ठलराव लंघे व माझ्यावर टाकली आहे. त्यामुळे तुम्हाला भविष्यात शिवसेनेची अनेक पदे देऊन तुमचा मान सन्मान केला जाईल परंतु तुम्ही जनतेत २४ तास जनतेच्या कामा साठी कटिबद्ध राहिले पाहिजे. पदे नुसती मिरवण्यासाठी दिले जाणार नाही तर ती जनतेच्या कामासाठी दिले जातील याची ही प्रत्येकाने दक्षता घ्यावी असा ही सल्ला आमदार खताळ यांनी शिवसैनिकांना दिला
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील कोणतीही व्यक्ती त्यांच्या अडीअडचणी किंवा समस्या घेऊन आले तर त्यांच्याशी तुम्ही विनम्रपणे वागले पाहिजेअसे निर्देश आपण सर्व शासकीय अधिकाऱ्यांना दिले आहे.त्यानंतर अधिकारी सुद्धा त्याला समन्वयाच्या भूमिकेतून मदत करण्यास तयार आहे. परंतु विनाकारण अधिका ऱ्यांना कोणीही त्रास द्यायचा नाही .परंतु अजूनही काही अधिकार मुजोरपणेवागत आहे. त्यांच्याबाबत जर तुम्ही मला पुरा व्यानिशी माहिती दिली तर त्यांचाही नक्कीच बंदोबस्त केला जाईल. जर तुम्हाला या तालुक्यातील सर्व सामान्य जनतेची काम होत नसेल तर स्वतःहून तुम्ही बदली करून घ्यावी.नाही जर कामामध्ये हलगर्जीपणा केला तर त्याची बदली वरतून थेट गडचिरोलीला केली जाईल. अशी ही तंबी वजा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.