पानेगांव ( जनता आवाज वृत्तसेवा):- आपला माणूस आपल्यासाठी हेच ब्रीद वाक्य अमलात आणून नेवासे तालुक्याचा विकास करणार असा शब्द खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत नेवासे तालुक्यातील सोनई बेल्हेकरवाडी,ते एम. डी. आर खेडलेपरमानंद ५/६०० कि.मी (५.५४ कोटी) गेवराई ते भेंडा बु.ते नजिक चिंचोली ते दिघी रस्ता ६/८०० कि.मी (५.०५ कोटी) नारायणवाडी, निपाणी निमगांव, खरवंडी, हिंगोणी ते विठ्ठलवाडी रोड ३/५३० कि.मी (२.९८ कोटी)या रस्त्यांचा कामांचा शुभारंभ बेल्हेकरवाडी (ता.नेवासे) खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर हे होते.खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे आगमन होताच फटाक्यांचा आताषबाजीने तसेच घोषणेने जल्लोषात स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की,खासदार वाकचौरे यांनी आठवण करून देताना सांगितले की, खासदार निधी काय असतो सुरुवातीला मी दाखवून दिले. शिर्डी मतदारसंघातील जवळपास सात तालुक्यात प्रत्येक गावात काम केले मी स्वतः प्रशासनातील सेवानिवृत्त अधिकारी तसेच येथील रहिवासी असल्याने मतदार संघातील अडिअडचणी वयक्तिक प्रश्न शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब,युवकांचे प्रश्नांनवर नेहमीच अग्रभागी ठेवून सोडविण्याचे काम केले. अशा पद्धतीने काम पुढे पुर्ण क्षमतेने सुरू राहणार असून तुमची खंबीर साथ हवी आहे.असं खासदार वाकचौरे यांनी सांगितले.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी जगदंबा देवी दर्शन घेऊन येथील ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थांनी, खासदार वाकचौरे तसेच शिवसेनेचे (उबाठा)गटाचे पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.बेल्हेकरवाडी येथी घरकुल, शिवरस्ता, अंतर्गत रस्ते त्याचबरोबर विजेचा सिंगल फेज बाबत तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून मार्गी लावला येथील ग्रामस्थांनी खासदार वाकचौरे यांचा जयजयकार केला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके, नेवासे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के, नेवासे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब गोल्हार, ग्राहक सेनेचे मुकुंद सिनगर,किशोर सोनवणे,सारंग फोफसे, युवासेनेचे पंकज लांभाते, शेतकरी सेनेचे पंडित सोनवणे,डॉ एकनाथ जाधव, बाबासाहेब फोफसे, बेल्हेकरवाडी सरपंच गणेश पवार, उपसरपंच सुदाम बर्डे, तंटामुक्ती अध्यक्ष भरत बेल्हेकर, दत्तात्रय बेल्हेकर, कानिफनाथ येळवंडे,गणेश गडाख, आसाराम बेल्हेकर, सुरेश शिंदे,कुंडलिक बेल्हेकर, सुभाष कुरकुटे,संजय गडाख, संतोष शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभाग भाऊसाहेब गुंजाळ, उपअभियंता संजय गायकवाड, ग्रामविकास अधिकारी कृष्णा बडे, जयराम कदम, शशिकांत बेल्हेकर, कैलास शिंदे, सिताराम रोठे,भाऊसाहेब राजळे, सकाहारी राजळे आदींसह मान्यवर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.सुत्रसंचालन बाळासाहेब सोनवणे यांनी केले आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले.