spot_img
spot_img

खंडोबा देवस्थानच्या विकासासाठी कटीबद्ध राहणार-आ.खताळ आ. अमोल खताळ यांच्या हस्ते खंडोबा महाराजांची महाआरती करून केला तळी भंडार

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-हिवरगाव पावसा येथील प्रति जेजुरी ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा देवगड देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्या तील ब वर्ग दर्जात समावेश करण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करू तसेच या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध राहू असा विश्वास आ अमोल खताळ यांनी व्यक्त केले आहे.

संगमनेर तालुक्यातील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा महाराज यात्रा उत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा होत आहे त्यानिमित्तानेआयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाचे आणि अश्वप्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी देवगड देवस्थान ट्रस्टच्या वतीने आ अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आला आणि संगमनेरचे लोकप्रतिनिधी या नात्याने प्रथमच आ खताळ यांच्या शुभहस्ते खंडोबा महाराज मल्हार मार्तंड यांचा अभिषेक करून महा आरती करण्यात आली तसेच येळकोट येळकोट जय मल्हार बोल सदानंदाचा येळकोट असा जयजयकार करत तळी सुद्धा भरण्यात आली.

आ खताळ म्हणाले की देवगड खंडोबा देवस्थान चा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून क वर्ग दर्जात समावेश करण्यात आलेला आहे येथून पुढील काळात या देवस्थानचा पर्यटन विकासात समावेश करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू तसेच या देवस्थाना च्या विकासासाठी येथून पुढे जी काही मदत लागेल ती मदत करण्यास कटिबद्ध राहील असाही विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपचे उपाध्यक्ष अशोक कानवडे सरपंच सुभाष गडाख उपसरपंच सुजाता दवंगे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणपत पावसे उपाध्यक्ष पांडुरंग गडाख सचिव मोठ्याभाऊ बढे खजिनदार चंद्र शेखर गडाख माजी भाजप तालुका ध्यक्ष व देवस्थानचे विश्वस्त काशिनाथ पावसे उत्तम जाधव गोरक्षनाथ पावशे यादव पावसे सुरेश पावसे कामगार पोलीस पाटील मथाजी पावसे भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश दवंगे केशव दवंगे शिव सेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे दादासाहेब गडाख सोमनाथ दवंगे मच्छिंद्र गडाख प्रकाश पावसे गणेश शिंदे ओम दवंगे विनोद पावसे निलेश पावसे भारत गोफणे संजय येरमळ रोशन येरमल यांच्यासह हिवरगाव पावसा सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ व यात्रा उत्सव समिती पदाधिकारी उपस्थित होते.

संगमनेर तालुक्यातील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा देवस्थान यात्रा उत्सव निमित्ताने आयोजित अश्व प्रदर्शन स्पर्धेत विजेत्या अश्व स्पर्धकांना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी देवस्थानच्या ठिकाणी भरविण्यात आलेल्या कृषी महोत्सवातील शेतकऱ्यांच्या स्टॉलला भेट दिली

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!