spot_img
spot_img

संगमनेरात एका विद्यालयात शिक्षकाकडून शिक्षकेला बेदाम  मारहाण  या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ,  विद्यार्थी भयग्रस्त 

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर येथील एका शाळेमध्ये एका शिक्षकाने चक्क आपले सहकारी असलेली शिक्षिका हिला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. परंतु या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी हे दहशतीच्या सावटाखाली आहे. कारण ही घटना  शाळेमध्येच घडली असून त्यामुळे अनेक  तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

या घटनेनंतर संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की विद्यालयातील मुख्याध्यापकाच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या फुल गुच्छ वरून किरकोळ भांडणाचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन शिक्षकाने शिक्षकेला विद्यार्थ्यांसमोर बेदम मारहाण केली आहे यामध्ये शिक्षकेच्या कानाला मार लागला आहे शिक्षकांनी शिक्षकेला मारहाणीचा प्रकार हा विद्यार्थ्यांसमोर घडल्यामुळे विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करून शिक्षकेला कार्यालयात नेऊन तिला पाणी पाजले संतप्त झालेल्या शिक्षकेने झालेला घटनेचा प्रकार शाळेचे मुख्याध्यापक व संस्था चालकांच्या कानी घातला चर्चा करून विषय मिटून टाकू असे मुख्याध्यापकांनी सांगितले पण नेहमी शेरोशायरी आणि दमबाजी करणाऱ्या शिक्षकांनी चक्क माझ्यावर हात उचलल्या यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकेने थेट पोलीस स्टेशन गाठले व सदर शिक्षकाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे संगमनेर तालुक्यातील शिक्षक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे लोक काम करतात की त्यांना समाजाचे भान सुद्धा राहिले नाही. अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे. या घटनेचा पालक वर्ग मधून तीव्र निषेध नोंदवला गेला आहे. या घटनेतील त्या शिक्षकावर तेथील प्रशासन योग्य ती  कारवाई करते की नाही हे पहा लागेल.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!