संगमनेर( जनताआवाज वृत्तसेवा):- शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महायुतीच्या वतीने १९ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
.संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहा वर आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमा बाबत महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विचारविनिमय करण्यात आला सकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला. दुग्धाभिषेक करूनशिवपूजन केले जाणार आहे १८वर्षाच्या पुढील मुला-मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.
संगमनेर नगरपालिके जवळील लाल बहादूर शास्त्री चौकातुन सायंकाळी चार वाजता या मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. ही मिरवणूक बाजारपेठ तेली खुंट क्षत्रिय समाज विठ्ठलमंदिर,मेनरोड,चावडी अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गे संगमनेर बस स्थानकावर या मिरवणुकीची सांगता होणार आहे.
तर मिरवणुकीमध्ये सनई-चौघडे ,वारकरी संप्रदाय ,संबळ लाठी काठी मर्दानी खेळ, गोमातेची मुर्ती.ढोली बाजा,बग्गी (बाल शिवराय व अन्य) तेजूर ,भैरवनाथ ,मावळ हे नामांकित ढोलताशा पथक सहभागी होणार आहे ,तसेच डि जे. शिवछत्रपती शिवाजी महाराज मुर्ती हे प्रमुख आकर्षण राहणार आहे तरी या मिरवणुकीमध्ये संगमनेर शहर आणि तालुक्यातील शिव प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महायुती च्या वतीने करण्यात आले आहे