शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):-छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा मोठा वारसा देशाला मिळाला आहे.आपल्याकडे असलेले गड किल्ले ही इतिहासाची प्रतिक आहेत.गड किल्ल्याच्या संवर्धनाचा मोठा कार्यक्रम महायुती सरकारने हाती घेतला असून शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब कृतीतून दिसले पाहीजे असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
नांदुर्खी बुद्रूक येथे लोकसहभागातून उभारलेल्या दगडी प्रवेशद्वाराचे उद्घाटन ह.भ.प. काशिकानंदजी महाराज यांच्या उपस्थिथीत करण्यात आले.यानिमित्ताने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. जेष्ठ विचारवंत प्रा.एस.झेड देशमुख, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, कैलास कोते, गोपीनाथ, गोंदकर सोन्याबापू चौधरी, राजेंद्र चौधरी, सरपंच मावधराव चौधरी, उपसरपंच सचिन कोळगे यांच्यासह पदाधिकारी , कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी लोकसहभागातून ग्रामस्थांनी उभारलेल्या प्रवेशद्वारामुळे गावाला गावपण आले आहे. पुर्वीच्या काळी गावात असलेली वेस ही इतिहासाची साक्ष असल्याचे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व वाटचालीत इतिहासाचे असे दाखले मिळतात. महाराजांच्या विचारांचा समृध्द वारसा आपल्याला लाभला असल्याचे स्पष्ट करून शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पारायण गावोगावी झाली पाहीजेत आशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आपल्याकडे असलेले गड किल्ले इतिहासाची प्रतिक आहेत. त्यांचे जपवणूक करणे पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची आहे. महायुती सरकारने गड किल्ल्याचे संवर्धन करण्याचा मोठा निर्णय घेवून महाराजांच्या इतिहास अधिक समृध्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
आपल्या जिल्ह्याचे भूषण पुण्यशलोक अहील्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार असून स्टॅच्यु आॅफ युनिटीच्या धर्तीवर उभारले जाणारे हे स्मारक महीला सक्षमीकरणाचा संदेश देणारे ठरेल.श्रीक्षैत्र नेवासा येथे संत ज्ञानेश्वर सृष्टी उभारून या जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र विकासला प्राधान्य देण्याचे काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिर्डी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे.उद्योजक गणेश निबे यांच्यानंतर आता टाटा गृपचे कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू होत असल्याने आपल्या भागातील युवकांना प्रशिक्षणाची मोठी संधी मिळेल.शिर्डी विमानतळाच्या इमारतीच्या कामासाठी १हजार ३००कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
पाण्याचे प्रादेशिक वाद कायमस्वरूपी मिटविण्यासाठी गोदावरी लाभक्षेत्रात अतिरिक्त पाणी आणण्याचे काम करावे लागले आहे.नदीजोड प्रकल्प ही मोठी उपलब्धी असून यासाठी कितीही निधी लागला तरी तो उभारण्याचे नियोजन करणार असल्याचे सांगून महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून स्व.गणपतराव देशमुख आणि खासदार साहेबांनी केलेल्या कामाचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.