श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर शहरात नेवासारोडच्या भागात असलेल्या स्टेट बॅंक शाखेजवळ अंजनाबाई अशोक पाटणी या महिलेच्या चेहर्यावर स्प्रे मारून दोघा अज्ञात चोरट्यांनी सौ. पाटणी यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व हातातील सोन्याच्या बांगड्या ओरडबडून पळून गेले आहेत.
आज भरदिवसा ११-४५च्या दरम्यान हा प्रकार घडला.शहरात स्प्रे मारून लुटण्याचा हा पहिलाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली असून गुन्हेगार स्थानिकच असावेत अशी घटनास्थळी चर्चा होती . अंजनाबाई व त्यांचे नातेवाईक शहर पोलीसात तक्रार देण्यासाठी गेले असून पोनि. देशमुख यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवीली आहे. गेल्या अनेक दिवसापासून श्रीरामपूर मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.