spot_img
spot_img

निर्धारीत वेळेत नागरीकांचे अर्ज निकाली काढण्याचे निर्देश- जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-नागरीकांकडून प्राप्त होत असलेल्या निवेदनाबाबत वरीष्ठ अधिकार्यांनी गांभीर्याने कार्यवाही करावी.गाव पातळीवरील सार्वजनिक प्रश्न आणि नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी आता पंधरा दिवसांनी सर्व विभागाचा आढावा घेणार आहोत.त्यादृष्टीने निर्धारीत वेळेत नागरीकांचे अर्ज निकाली काढण्याचे निर्देश जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

मंत्री विखे पाटील यांनी प्रवरानगर येथील डॉ धनंजयराव गाडगीळ सभागृहात जनता दरबाराच्या माध्यमातून मतदार संघातील आणि जिल्ह्यातील नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या.प्राप्त अर्जावर तातडीने कार्यावाही होण्याच्या दृष्टीने त्यांनी संबधित विभागातील अधिकार्यांशी संपर्क साधून समस्या मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.

यापुर्वी जिल्हा स्तरावर वीज वितरण कंपनी परीवहन आणि जलसंपदा विभागांचा आढावा आपण घेतला आहे.अधिवेशन संपल्या नंतर सार्वजनिक वितरण व्यवस्था,जलसंधारण आणि कौशल्य विकास कार्यक्रमाचा आढावा आपण घेणार असल्याचे सांगून, बैठकीत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली की नाही याचा आढावा आता दर पंधरा दिवसांनी आपण घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रालय स्तरावर प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील तसेच सर्व विधानसभा कार्यक्षेत्रातील प्रकल्प योजनांची अंमलबजावणी आणि नव्याने सुरू करायाच्या सार्वजनिक कामा बाबत सर्व आमदारांच्या समवेत मंत्रालयात आमदार आणि वरीष्ठ अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली.या बैठकीत झालेल्या निर्णयाचा पाठपुरावा करण्यासाठी आता प्रत्येक तालुक्यात आमदारांच्या पुढाकारने समन्वय बैठक घेवून प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून सर्व विभागांनी व्यक्तिगत योजनांचे लाभ तसेच सार्वजनिक उपक्रमाबाबत अतिशय संवेदनशील राहून काम करण्याचे निर्देश मंत्री विखे यांनी दिले आहेत.

आज मंत्री विखे पाटील यांनी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या तसेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!