कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा):-विधानसभा निवडणुकीच्यावेळी आपल्या विरोधात खोटा अपप्रचार झाला. अनेक भावी मुख्यमंत्री तयार झाले. याच भगवतीमाता मंदिरासमोरच्या सभेत विरोधकांनी खालच्या पातळीवर प्रचार केला होता. खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची पध्दत. जे लोक भगवतीमातेसमोर खोटं बोलले त्यांच्यावर कोप झाला. आता ते मुख्यमंत्री तर सोडाच, कधी आमदार पण होणार नाही अशी व्यवस्था जनतेने करून ठेवली असल्याचा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावत आपल्याकडे सुपारी घेणारे फार आहेत. असे ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
कोल्हार भगवतीपूर येथील भगवतीमाता मंदिराच्या प्रांगणात ग्रामस्थ व डॉ. सुजय विखे पाटील मित्रमंडळाच्यावतीने ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ना. विखे पाटील बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी याच ठिकाणी आपली मोठी सभा झाली होती. आतापर्यंत या गावात एवढी मोठी ऐतिहासिक सभा कधी झाली नाही आणि भविष्यात कधी होणारही नाही याची आठवण करून देत ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, कोल्हार भगवतीपूर येथील ग्रामस्थ आणि कार्यकत्यांनी ना. राधाकृष्ण विखे यांच्या कोल्हार भगवतीपूर येथे नागरी सत्कार १२०० किलो फुलांचा हार नागरी सत्काराचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी बॉम्बे बॉईज हा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला.
आगमनानंतर ओपन जिप्सीमधून ना. विखेंची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यात भटिंडा पंजाब येथील मिलिटरी फेम पाईप बँड पथक होते. कार्यक्रमात १२०० किलो फुलांच्या २५ फुटी पुष्पहाराने ना. विखेंचा सत्कार करण्यात आला.
या नागरी सत्कारातून माझ्यावर भरभरून प्रेम व्यक्त केले. यात तरुणांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या सत्काराने मी भारावून गेलो. कोणत्या शब्दांत आभार मानावे ते कळेना. जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच माझी ऊर्जा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के म्हणाले, जिल्ह्यातील कुकडी, गोदावरी, भंडारदरा, निळवंडेचे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम ना. विखे यांच्याकडून सुरू आहे.



