शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- शिर्डी जवळील काकडी विमानतळानजीक शुक्रवारी मध्यरात्री कोपरगाव तालुक्यातील असलेल्या काकडी (शिर्डी) विमानतळाला लागून दक्षिण बाजूस असलेल्या (संवत्सर) येथील रहिवासी असलेल्या) भोसले वस्तीवर रात्री अज्ञात इसमांनी कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात कृष्णा साहेबराव भोसले (वय ३२) व त्यांचे वडील साहेबराव पोपट भोसले (वय ६०) हे दोघे ठार झाले आहे तर साखरबाई साहेबराव भोसले (वय-५५) (आई) ही गंभीर जखमी झाली आहे
तर त्यांची सासू गजुबाई मारुती दिघे (वय ७०) या मात्र या हाणामारीपासून संशयास्पदरित्या बचावल्या आहेत. दरम्यान ही घटना जाणीवपूर्वक केलेला खून आहे की दरोडा याचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला आणि त्यांचे सहकारी घेत असून घटनास्थळी श्वानपथक घेत आहे. या घटनेने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.



