23.9 C
New York
Monday, August 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोल्हारमध्ये दोन अपघातात एक ठार, एक जखमी

कोल्हार (जनता आवाज प्रतिनिधी ) :- कोल्हार भगवतीपूर येथे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक दुचाकीस्वार जागीच  ठार झाला तर दुसऱ्या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला. 
रोहित अरुण लोखंडे (वय २२, रा. कोल्हार ) असे मृताचे नाव आहे. तो दुचाकीवरून लोणीहून कोल्हारकडे येत असताना कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाजवळ समोरून येणाऱ्या एका वाहनाची त्याला धडक बसली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला. 
दुसरा अपघात आनंदऋषीजी चौकाजवळ झाला. नाजीर बाबूलाल शेख (वय ५२, रा. कोल्हार) पायी चाललेले असताना त्यांना समोरून येणाऱ्या वाहनाची जबर धडक बसली. त्यात त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली. पोलिसांनी त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!