श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- आज श्रीरामपूरमध्ये ड्रग्सनंतर लाखोंचा गांजाही जप्त श्रीरामपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.विक्रीस बंदी असलेला 201.609/- कि.ग्रॅ. गांजासह 40,24,135/- रु. ( चाळीस लाख चौविस हजार एकशे पसस्तिस रुपये )किंमतीच्या मुद्देमालासह दोन आरोपीस अटक, श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी केली आहे.
दि. 15 रोजी रात्री 9:20 वा. सुमारास खेरी निमगाव ते श्रीरामूपर रोडवर एका काळया रंगाच्या महींद्रा एक्स यु.व्ही. 500 गाडीमधुन गांजा या अंमलीपदार्थाची वाहतुक होणार असलेबाबत खात्रीशिर बातमी मिळाल्याने मा. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांनी तात्काळ मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपुर डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या परवानगीने तात्काळ सदर ठिकाणी सापळा लावला व बातमीतील वर्णनाप्रमाणे चारचाकी वाहन येताच सदर वाहनास थांबवुन त्यामधील इसमास त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव ज्ञानेश्वर विठ्ठल जाधव, (वय 45 वर्षे, रा. दुगाव ता. चांदवड, जि. नाशिक) रमेश विठ्ठल जाधव (वय. 38 वर्षे, रा. दुगाव ता. चांदवड, जि. नाशिक) असे सांगितले. सदर इसमासची व त्यांच्या गाडीची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर गाडीच्या डिक्कीमध्ये खालील वर्णनाचा विक्रीस बंदी असलेला उग्र व दर्प नशा आणणारा वास असलेला गांजा हा अंमलीपदार्थ मिळून आला.
सदर गांजाबाबत व वाहनाबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचे वाहन हे आरोपी क्रं.01 नामे ज्ञानेश्वर विठ्ठल जाधव, वय 45 वर्षे, याचे नावावर असल्याचे सांगुन सदरचा गांजा हा आम्ही दोन्ही भावांनी मिव्ळुन श्रीरामपूर येथे विक्री करीता आणल्याचे सांगितले व सदर गांजा बाळगण्याबाबत आमच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. तरी त्यांच्याकडे मिळुन आलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे,
30,24,135/-रु. किंमतीचा 201.609 कि.ग्रॅ. वजनाचा 10 गोण्यामधील 97 विटकरी रंगाचे प्लास्टीकचे वेष्टांकीत केलेल्या बॉक्समधील हिरवट रंगाचा सुकलेल्या पानाने, फुलाने व बियाने भरलेला लगदा त्यास उग्र व दर्प नशा आणणारा वास असलेला गांजा हा अंमलीपदार्थ. (प्रत्येकी 15,000/-किलो प्रमाणे किंमतीचा)10,00,000/- रु. किं.ची महिंद्रा कंपनीची काळया रंगाची एक्स.यु.व्ही.500 तिचा क्रं. MH-02, EE-6999 या क्रमांकाची कार जुवाकिंअं.40,24,135/- रु. एकुण किंमतीचा मुद्देमाल.येणे प्रमाणे वरील वर्णनाचा किंमतीचा मुद्देमाल पोनि. नितीन देशमुख साो. यांनी पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करुन जप्त केला व नमुद आरोपीवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं. 500/2025 एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985 चे कलम 8 (क), 20 (ब), ii (क) प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करुन त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबमें साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर. डॉ. बसवराज शिवपूजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोना.शरद अहिरे, पोकों.संपत बडे, पोकों.अमोल पडोळे, पोकों.अमोल गायकवाड, पोकों. संभाजी खरात, पोकों.मच्छिंद्र कातखडे, पोकों.अजित पटारे, पोकों.अकबर पठाण, पोकों.सागर बनसोडे, पोकों.आजिनाथ आंधळे, पोकॉ. रामेश्वर तारडे, पोकों. सचिन दुकळे, पोकों. रविंद्र शिदे, पोकों. सुशिल होलगिर, चालक सफौ. राजेश सुर्यवंशी, तसेच मा. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील पोहेकों. सचिन धनाड यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोबरे हे करीत आहेत.