राहाता (जनताआवाज वृत्तसेवा):- राहाता शहरातील ईदगाह मैदानात आज सकाळी आनंदाने आणि भक्तीभावाने भरले होते. इदुल अजहा बकरी ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून नमाज पठण केले. हा पवित्र सण त्याग,प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक मानला जातो,आणि येथील वातावरणातही हाच उत्साह दिसून आला.
बकरी ईद हा सण केवळ धार्मिकच नाही,तर सामाजिक एकतेचे आणि परस्पर प्रेमाचे प्रतीक आहे.शहरातील या उत्सवाने सर्वांना एकत्र आणले आणि समाजात शांती व बंधुभावाचा संदेश दिला.
यावेळी मौलाना याहया कासमी, मौलाना रफिक, मौलाना मसूद, मौलाना रेहान, मौलाना अजीम, मौलाना अल्ताफ, हाफिज अकिल, इलियास शाह, हाजी मुन्नाभाई शाह, मुस्ताक शाह, समीर बेग, माजी नगरसेवक सलीम शाह, अस्तगांवचे सामाजिक कार्यकर्ते बशीर शेख,मुन्ना फिटर,इरफान शेख,सुलेमान शेख,यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.




Total Users : 600067