लोणी दि.८ प्रतिनिधी
गर्भपिशवीचा कॅन्सरला न घाबरता योग्य वेळी उपचार, तज्ञांचे मार्गदर्शन, सकात्मक विचार आणि योग्य वेळी निदान झाल्यास हा आजार बरा होणारा आहे असे प्रतिपादन जेनपथ लैब, पुणेच्या संचालिका डॉ. सुजाता माने यांनी केले.
लोणी येथे जनसेवा फौडेशन, पायरेन्स संचालित डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर लोणी बु।।, घारडा केमिकल्स आय शेअर फौडेशन आणि डॉ. विखे पाटील फौडेशन, विळद घाट यांच्यावतीने आयोजित गर्भाशयमुख कर्करोग निदान शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. माने बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीलाई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास डॉ. सरिता इनामदार, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका लिलावती सरोदे, पायरेन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुप्रिया ढोकणे पाटील, संचालक डॉ. निलेश बनकर, प्रकल्प संचालिका रूपाली लोंढे, डॉ. मोहसिन तांबोळी आदीसह महीला उपस्थित होत्या.
गर्भाशयमुख कर्करोग महीलांमध्ये मोठी समस्या आहे. पण हा आजार बरा होणारा आहे असे डॉ सुजाता माने यांनी सांगुन आजाराची लक्षणे, उपचार, निदान पध्दत आणि लसीकरण यावर मार्गदर्शन केले. जनसेवा आणि पायरेन्स ने आयोजित शिबीरातून मोठी जागृती होईल असा विश्वास निर्माण प्रयत्न केला.
आपल्या मार्गदर्शनात सौ.शालिनीताई विखे पाटील म्हणल्या महीलांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. महीलांमध्ये ही समस्या मोठी आहे. यामुळे न घाबरता निदान करावे वैद्यकीय संशोधनालामुळे लसीकरण, आधुनिक उपचार यामुळे हा आजार बरा होणारा आहे. या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात ही महीलांच्या आरोग्यासाठी प्रयत्न सुरू राहतील पेण यात आपण सहभागी व्हावे असे सांगितले.
प्रारंभी लिलावती सरोदे यांनी या उपक्रमाचा आढावा घेत विविध सामाजिक उपक्रमाची माहीती दिली. या शिबीरामध्ये तीन हजाराहून अधिक महीलांची मोफत तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार डॉ. निलेश बनकर यांनी मानले.