राहुरी ( प्रतिनिधी ) :- ऋषी – मुनींनी तयार केलेल्या आयुर्वेदाने आपला प्रभाव नेहमी दाखवून दिला आहे . त्याचबरोबर आयुर्वेदाचे महत्त्व आपणास पटवून दिले आहे . ज्याकाळी कोणत्याही प्रकारचे इतर औषध उपचार नव्हते , त्यावेळी आयुर्वेदिक औषधाच्या माध्यमातून विविध उपचार केले जात . इतिहास बघितला तर आयुर्वेदामध्ये किती मोठी ताकद आहे हे लक्षात येईल . त्यामुळे नागरिकांनी आता आयुर्वेदिक औषध उपचारांकडे वळाले पाहिजे , असे आवाहन डॉ . बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मच्छिंद्र तांबे यांनी केले .
निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेद आवश्यक :- तांबे / राहुरी फॅक्टरी येथे सुवर्णप्राशन शिबीरात ७५० बालकांचे लसीकरण
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालयात काल रविवारी सुवर्णप्राशन संस्कार शिबिराचे मोफत आयोजन केले होते . त्यावेळी ते बोलत होते . शिबिरात सुमारे परिसरातील सुमारे ७५० बालकांना सुवर्णप्राशन लसीकरण करण्यात आले .
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . विलास कड , डॉ . अश्विनी बोरा , संस्थेचे उपप्राचार्य डॉ . संतोष बांगर , राहुल बंगाळ , कार्यक्रमाचे प्रमुख संदेश चोखर डॉ . भागवत वीर डॉ . प्रीती वीर , डॉ . राजश्री वने , डॉ . उज्वला कड , डॉ . माधुरी कुलकर्णी , डॉ . खरात आदी मान्यवर उपस्थित होते .
तांबे म्हणाले की , आयुर्वेदाचे महत्त्व हे प्राचीन संस्कृती पासून आहे . १६ संस्कारांना विशेष महत्त्व भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये आहे . यासाठी आयुर्वेदात मुलांची शारीरिक मानसिक व बौद्धिक वाढ होत असताना विविध संस्कार करण्याचे वर्णन केले गेले आहे . या संस्कारांपैकीच एक सुवर्ण प्राशन हा संस्कार आहे . सुवर्ण व बुद्धिवर्धनासाठी व प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे सर्वोत्तम द्रव्य आहे . त्यामुळे लहान मुलांसाठी विवेकानंद नर्सिंग होमच्या माध्यमातून राबवलेला हा उपक्रम सर्वांसाठी नक्कीच उपयुक्त आहे .
डॉ . अश्विनी बोरा म्हणाल्या की , या सुवर्णप्राशन संस्कार शिबिराच्या माध्यमातून बालकांना नक्कीच फायदा होणार आहे . या बालकांना मोफत दिल्या . जाणाऱ्या डोसमुळे त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढेल पचनशक्ती वाढेल , शारीरिक बळ वाढेल , शरीराची कांती वाढेल , बहुतेक क्षमता वाढेल , ऋतू मुळे होणाऱ्या आजारांपासून त्यांचे संरक्षण होणार आहे . त्यामुळे सर्वांनी याचा फायदा घेणे गरजेचे आहे . पुष्प नक्षत्राचे विशेष महत्त्व असल्याने सहा महिने ते बारा वर्ष वयोगटातील बालकांना हा डोस दिला जाणार आहे . याचा सर्वांनी लाभ घेणे गरजेचे आहे .
यावेळी डॉ . विलास कड यांचे देखील भाषण झाले . डॉ . प्रीती वीर यांनी सूत्रसंचालन केले . डॉ . संदेश चोखर यांनी आभार मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व पदवीधर विद्यार्थी यांच्यासह विवेकानंद नर्सिंग आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले . यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपले बालके डोस देण्यासाठी आणले होते .