26.4 C
New York
Sunday, June 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपुरातील पूर्णवाद नगर परिसरात पोलिसांचा मटका अड्ड्यावर छापा 8 लाख 61 हजार 560 रुपये इतका मुद्देमाल जप्त सुमारे 22 जणांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील पूर्णवाद नगर परिसरात पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापा टाकून 8 लाख 61 हजार 560 रुपये इतका मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सुमारे 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र मुकिंदा अभंग यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अजित पटारे, श्री. काकडे आदींना परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे यांनी पुर्णवादनगर परिसरात (मुळा प्रवरा, वीज सोसायटी जवळ) काही इसम मटका जुगाराची बुकींग घेत असल्याची माहिती दिली. तात्काळ पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन जावून खात्री केली असता पुर्णवादनगरकडे जाणा-या रोडवरील मुळा-प्रवरा वीज सोसायटीच्या बाजुला दक्षिणमुखी लोखंडी गेटच्या आतमध्ये प्रवेश केला असता दोन बंद खोल्यांचे दरवाजे उघडुन पाहीले असता दोन्ही खोल्यांमध्ये एकुण 22 इसम भिंतींच्या कडेला बसलेले व हातामध्ये मोबाईल तसेच कॅल्क्युलेटरवर मटका बुकीचा हिशोब करतांना मिळुन आले.

त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी मुनीर इमाम पठाण (मुख्य मटका बुकी, वय-55, रा. सुभेदारवस्ती), किसन मसु शिंदे (वय-70, वार्ड न.0.3, दत्त मंदिराशेजारी), अवधुत मारुती शिंदे (वय-23 रा. संजयनगर), महेश रामकृष्ण पवार (वय-45, रा. वार्ड २), विक्रांत रविंद्र लोखंडे (वय 35, रा. वार्ड नं.07 लबडे वस्ती), राहुल कैलास चौधरी (वय-30, रा. मोरगे वस्ती), ललीत नामदेव तांबे (वय-29, रा.प्रवरानगर, लोहगाव ता.राहता), राजु दिनकर पाभारे (वय-56.रा. सुतगिरणी फाटा), मंजुर सय्यद (वय-36, रा. काजी बाबा रोड, श्रीरामपुर), ख्वाजाखान सरदारखान पठाण (वय-48, रा-सुभेदार वस्ती, वार्ड नं.02), स्वप्निल नामदेव तांबे (वय-32, रा. प्रवरानगर), नानासाहेब रंगनाथ तोंडगे (वय-45, रा. अशोकनगर), नसरुद्दीन शेख (वय 60, उंदिरगाव, ता. श्रीरामपुर), अल्ताफ अरमान शेख (वय-62, रा. मिल्लतनगर, श्रीरामपुर), सादिक सहाबुद्दीन शेख (वय-30, रा.नगर वार्ड नं.1, श्रीरामपुर), आकाश कैलास पोटे (वय-24 ,रा. जवाहर कारखाणा), लालजीत अर्जुन यादव (वय-31, रा. वार्ड नं.05 श्रीरामपुर), संदिप बाबुराव सुर्यवंशी ( रा. भैरवनाथनगर, गौधवणी), सचिन नंदकुमार गावडे (वय-37, मोरगे वस्ती), सागर सुरेश भनगे (वय-30, रा. राजुरी, श्रीरामपुर), शाहरुख चांद खान (वय-28, रा. कोल्हार ता. राहता) असे असल्याचे सांगितले. सदर इसमाकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही मटका जुगाराची बुकींग घेत आहोत. तसेच सदर खोलीत मिळुन आलेल्या मोबाईलबाबत हजर इसमांकडे विचारपुस केली असता हजर इसमांतील मुनीर इमाम पठाण ह्याने सांगितले की, सदर मोबाईल हे माझ्या मालकीचे असुन ते मी मटका बुकींगकरीता वापरत असल्याची कबुली दिली.

सदर कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे त्यांचे पथकातील पोसई राजेंद्र वाप, सफी शेख, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री. चौधरी, दिगंबर कारखेले, दिनेश मोरे, श्री. भिंगारदिवे, सर्वश्री पवार, साठे, खेडकर, तांबे, दिपे, ढाकणे, जाधव तसेच श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अजित पटारे, काकडे आधी मी पार पडली याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!