spot_img
spot_img

मनपा कर्मचाऱ्यांनी एकमेकांमध्ये मतभेद न ठेवता एकजुटीने शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम करावे – आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा) :- महानगरपालिका कर्मचारी युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार संग्राम जगताप व मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जितेंद्र सारसर यांच्या अध्यक्षतेखाली खेळी-मेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली, सभासद दत्तात्रेय फटांगरे यांन युनियनच्या अध्यक्षपदी जितेंद्र सारसर व बाबासाहेब मुदगल यांच्या नावाची सूचना मांडली. तर सभासद अनिल लोंढे यांनी आनंद वायकर यांची सचिव पदाच्या नावाची सूचना मांडली, व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी जल अभियंता परिमल निकम, अस्थापाना विभाग प्रमुख मेहर लहारे आदी सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले की, मनपा कर्मचाऱ्यांनी एकमेकांमध्ये मतभेद न ठेवता एकजुटीने शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम करावे. मी महापौर पदावर काम करीत असताना माझे वडील स्व. अरुणकाका जगताप यांनी एकमुखाने कर्मचाऱ्यांचा सहावा वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितले होते आणि तो मार्गी लावला. आता देखील सातवा वेतन आयोगाचा प्रश्न देखील मीच मार्गी लावला आहे, महापालिका ही शहराची प्रमुख संस्था असून तिच्या हिताचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. आता शहरात रस्ता कॉंक्रिटीकरणाचे कामे मार्गी लागत असून पुढील काही काळामध्ये महापालिकेच्या माध्यमातून रस्त्याच्या साफ-सफाई साठी मशीन आणले जाणार आहे. त्यामुळे झाडू कामगारांचा बराचसा तान कमी होणार आहे. कामगार युनियनच्या माध्यमातून कर्मचारी हिताचे प्रश्न मार्गी लागत असून त्यांनी कामगारांच्या हिताची भूमिका पार पाडावी असे ते म्हणाले.

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, शासनाकडून येणाऱ्या अनुदानामध्ये महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही पगारापोटी दर महिन्याला ३ कोटी रुपये टाकावे लागतात उत्पन्न वाढीसाठी आपल्या सर्वांना काम करावे लागणार आहे. मार्केट विभागाकडून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही, मात्र त्या ठिकाणावरून चांगले काम केल्यास मोठे उत्पन्न महापालिकेला निर्माण होईल. आपण महापालिकेचे सेवक आहात आणि जनता मालक आहे. तरी कर्मचाऱ्यांनी नगरकरांना चांगली सेवा द्यावी, आणि महापालिकेचे जास्तीत जास्त उत्पन्न वाढेल असे काम करावे असे ते म्हणाले.

आनंद वायकर म्हणाले की, महापालिका कामगार दिनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार महापालिकेतील १५० कर्मचाऱ्यांना नोकरी मिळाली आहे. याचबरोबर सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे हा देखील प्रश्न मार्गी लागला आहे. कर्मचाऱ्यांना आपल्या कामकाजामध्ये येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी युनियन नेहमीच तत्पर असते, महापालिकेची कर्मचारी चांगली सेवा देत असून या पुढील काळात अजून सुधारणा करत नगरकरांना चांगली सेवा दिली जाईल असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार नेमाने यांनी केले तर आभार प्रदर्शन बाबासाहेब मुदगल यांनी मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!