17.6 C
New York
Saturday, June 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिक्षकी पेशाला काळीमा अल्पवयीन मुलीचा विनयभंग…

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- विद्यार्थिनीचा विनयभंग व लैंगिक छळ केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणातील आरोपींना त्वरित जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या प्रकरणी एका कोचिंग सेंटरच्या दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकी पेक्षाला काळीमा फासणारी घटना एका मागून एक घडत आहे. आता खासगी कोचिंग क्लासमध्ये अशा घटना वाढू लागलेल्या आहेत. त्यामुळे आता हा प्रकार टाळण्यासाठी कोचिंग क्लासेला सुरक्षा असणे आवश्यक आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकवेळस मुलीला या छळाला सामोरे जावे लागले. दोन्ही शिक्षक तिला कोचिंग सेंटरच्या कार्यालयात बोलावून तिला कपडे काढण्यास भाग पाडत असत. त्या अवस्थेत मुलीचे फोटो काढल्यानंतर आरोपी शिक्षक तिच्यासोबत अश्लील कृत्येही करत असत. सततच्या छळाला कंटाळून धाडस दाखवत पीडित मुलीने तक्रार दाखल केली.

पीडित मुलीने गुरुवारी बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दोन्ही शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपी फरार आहे आणि पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!