17.6 C
New York
Saturday, June 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात दरोडेच्या तयारीत असलेल्या टोळी विरुद्ध गुन्हा दाखल

कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा ):-दि. २८ रोजी पहाटे ०४.३० वाजता गोपनीय माहितीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व पथकाने पहाटे साडेचार वाजताचे सुमारास शिर्डी ते लासलगाव डांबरी रस्त्यावर वेळापूर गावात शिवारात ब्राह्मण नाल्याजवळ वेळापूर येथे तपासणी दरम्यान कारवाई केली.

या कारवाईत चेतन महेश पिंपळे (वय 25 वर्ष रा. पिंपळे सदन, गोसावी वाडा नाशिक रोड नाशिक) नंदू राजू पिंपळे (वय 22 वर्षे रा. मोती नगर सुरेगाव तालुका कोपरगाव)  विकी सावळीराम काळे (रा.शहाजापूर ता. कोपरगाव) फरार संदीप दादा काळे राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव फरार दत्तू जानू पिंपळे राहणार मोती नगर सुरेगाव तालुका कोपरगाव सर्व जिल्हा अहिल्यानगर फरार यांचेवर भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 310 (4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वरील तारखेच्या व नोंदलेल्या वेळेच्या अनुसार नमूद केलेल्या ठिकाणी सर्व व्यापारी वरील आरोपी हे लोखंडी कोयता फोल्डिंगचे दोन कटर लोखंडी पाईप अशी हत्यारे बाळगून दरोडा घालण्यासाठी एकत्र जमलेले दिसून आले हे सर्व आरोपी पोलिसांना बघितल्यानंतर तिथून पळून गेले .

सदर ठिकाणी हून दहा हजार रुपये किमतीचा न्यू रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल 3 लाख रुपये किमतीची सिल्वर ग्रे रंगाची होंडा सिटी क्रमांक एम एच 03 ए डब्ल्यू 24 29 12 आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता सन 20123 चे कलम 310 (4) प्रमाणे सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश अशोक तमनर यांच्यावतीने कायदेशीर फिर्याद देण्यात येऊन आरोपींवर गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर कमलाकर चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!