शिरसगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- र्शिरसगाव येथे २/४ वर्षापासून २/३ बिबट्याची दहशत पसरली होती अनेक वेळा पिंजरा लावला.कधी वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत होते.आता वारंवार बिबट्या निदर्शनास आल्याने ८ दिवसापासून पवार व बकाल वस्तीवर पिंजरा लावण्यात आला होता.
मनोज बाबासाहेब पवार यांच्या घरापसुन बिबट्याने सोमवारी रात्री एक कुत्रे उचलून नेले.व निम्मे अर्धे खाल्ले.त्याची फरपट पाहत मागोवा घेण्यात आला.उसात जाऊन पहिले तर अर्धे कुत्रे आढळले.
या आधी भागवत बकाल यांचे गोठ्यातील कुत्रे धरले होते त्यावरून बिबट्या असल्याचे वाटले.पिंजरा उपलब्ध होताच लगेच विशाल बकाल नवनाथ बकाल यांनी ट्रक्टर लावून संजय भगवान पवार वस्तीजवळ पिंजरा तेथे नेला व अर्धे खाल्ल्लेले कुत्रे पिंजऱ्यात ठेवले.त्यासाठी ओम बकाल,अमोल बकाल,सोमनाथ पवार,शामराव जगताप प्रतिक बकाल,याचेही सहकार्य झाले.
सोमवारी ९ वा बिबट्या पिंजराजवळ आला.व त्याने २/४ चकरा मारल्या.रात्री ११.३० व बारा वाजेदरम्यान बिबट्या कुत्रे खाण्यासाठी पिंजऱ्यात घुसला व अडकला,व जेरबंद झाला.रात्री लाईट नसल्याने पिजरा पाहायला शेजारी जमले व त्याचा आवाज आला तर बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसले.वनविभागाला बाळासाहेब बकाल यांनी गणेशराव मुद्गुले यांना कळविल्यावर वनविभाग अधिकारी यांना कळविले.
त्याप्रमाणे दिवस उजेडायचे आत वनविभाग अधिकारी विलास ढगळे व सहकारी आले.व सकाळी ८.३० वा.या पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात टाकण्यात आला व येथे अजून बिबट्या असल्याने एक पिंजरा तेथेच ठेवला.यासाठी वस्तीवरील विशाल बकाल,सागर पवार मनोज पवार,यांनी या जेरबंद कामात मदत केली.अशी माहिती भागवत बकाल यांनी दिली.



