श्रीरामपूर (जनता आज वृत्तसेवा):-आज श्रीरामपूर शहरमध्ये रात्री सव्वा आठच्या दरम्यान श्रीरामपूर नगरपालिका परिसरात पाच ते सहा जणांनी दोन तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला आहे.
रात्री सव्वा आठच्या दरम्यान श्रीरामपूर नगरपालिका परिसरात साई साळवे व रुद्रा जगधने हे दोन तरुण उभे असताना त्या ठिकाणी पाच ते सहा तरुण तेथे येऊन यांच्यावर अचानक धारदार शास्त्रांनी हल्ला केला. त्यामुळे परिसरामध्ये तणावयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. ज्यावेळी हा हल्ला होत असताना तेथे आसपास मोठ्या प्रमाणात वर्दळ होती . अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सर्व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामध्ये रुद्रा जगधने हा गंभीर जखमी झाला आहे. त्यावरती लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. हा हल्ला कोणी केला आणि कशामुळे केला . हे अद्यापही कळाले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.