13.9 C
New York
Tuesday, April 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

केंद्रातील भाजप सरकारकडून मूलभूत तत्त्वांची पायमल्ली -कॉ नवले बहुजन शिक्षण संघाचे संस्थापक प्रेमानंद रुपवते यांचा स्मृतिदिन कार्यक्रम

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):-
आपल्या देशात सध्या लोकशाही धर्म निरपेक्षता सार्वभौमत्व संघराज्य प्रणाली तसेच सामाजिक आणि आर्थिक न्याय हि आयडिया ऑफ इंडियाचे मूलभूत तत्व आहे मात्र ते नुलभुत तत्वच आता संकटा मध्ये सापडलेले असून या तत्त्वांची सध्या च्या केंद्रातील मोदी सरकारकडून पाय मल्ली होत असल्याची टीका अखिल भार तीय किसान सभेचे केंद्रीय सहसचिव कॉ डॉ अजित नवले यांनी केली.
बहुजन शिक्षण संघाचे संस्थापक प्रेमानंद रुपवते यांच्या स्मृतिदिना निमित्त मालपाणी लॉन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत कॉ नवले बोलत होते यावेळी व्यासपीठावर पुणे येथील विधीज्ञ व सामाजिककार्यकर्ते ऍड असीम सरोदे माजी आ डॉ सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे बहुज शिक्षण संघाचे अध्यक्ष ऍड संघराज रुपवते राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रुपवते नीला लिमये,, सोन्याबापु वाकचौरे,कॉ.कारभारी उगले, आरिफ तांबोळी,सचिन गुजर,हेमंतओगले, बी.आर कदम, वसंत बैचे, कार्लस साठी , सिताराम राऊत, डॉ.सोमनाथ मुटकुळे , यांच्या सह अहमदनगर, मुंबई ,पुणे, कर्जत, श्रीरामपूर, कोपरगाव ,अकोले, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
कॉ डॉ नवले म्हणाले की म्हणाले की मागील वर्षी कोविडची साथ आली होती मात्र सध्या राजकारणात तत्वज्ञाला बद लून पक्ष बद्दलण्याची साथ आलीआहे ही साथ राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने अंत्यत घातक आहे तसा आपणा सर्वांना पाच मुद्द्यांचा आयडिया ऑफ इंडियाहवा आहे तसा आयडिया ऑफ इंडिया केंद्रा तील मोदी सरकारला नकोसा आहे जर त्यांच्या म्हणण्यानुसार आयडिया ऑफ इंडिया अस्तित्वात आला तर देशाचे दुस ऱ्या क्षणी तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही अशी भीती त्यांनी व्यक्त करत ते म्हणाले की हा लढा आपणा सर्वांना निर्भ यपणे पुढे न्यायचा आहे त्यासाठी सर्वांनी जागरूक होणे गरजेचे आहे जगात विश्व गुरूच्या यादीत जाणाऱ्या भारताचा भुके च्या सर्वेमध्ये जगातील १२१ देशांत भार ताचा१०७वानंबर लागत असल्याचीभीती त्यांनी व्यक्त केला सध्या देशात विरोधी पक्षांची इंडिया नावाची आयडिया ऑफ इंडिया हे इंडिया आघाडी तयार झाली आहे ती समजून घेत आत्मसात करून तिचा प्रसार आणि प्रचार करणे गरजेचे असल्याचे सांगत ते म्हणाले की आपल्या सगळ्या विचार प्रक्रियेचा पुन्हा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाल्या शिवाय तरणोपाय नाही आणि त्याचा प्रचार आणि प्रसार तुम्हा आम्हालाकरावा लागेल लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक आर्थिक न्यायाच्या बद्दल आप ल्याला विनाजोड संघर्ष करावा लागेल तडजोड न करता निर्भयपणे आणिव्यक्ति निष्ठपणे या सर्व संकटाशी सामना करा आणि आयडिया ऑफ इंडिया जागृतठेवा असा सल्ला त्यांनी दिला.
जेष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे म्हणाले की सध्या केंद्र सर कारच्या वतीने ईडी सरकार आणि सीबी आय या शासकीय यंत्रणेचा वापर चुकीच्या पद्धतीने करत आहे सध्या देशामध्ये आम्ही सांगू तसेच झाले पाहिजे असा सो करे कायदा करण्याची काही राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे जर आपल्या देशातील लोक शाही खऱ्या अर्थाने वाचवायची असेल तर तुम्हाआम्हा ला कशा पद्धतीने वागा यचे हे ठरवावे लागणार असल्याचे सांगत ते म्हणाले कीकट्टरवादी मुस्लिम आणि कट्टरवादी हिंदू हे एकच आहे येथून पुढे आपला लढा फक्त कट्टरवादयांशी राह णार आहेत्यामुळे इथून पुढे सर्वांनी एकत्रित येत हा लढा लढण्यासाठी सज्ज व्हा असा ही सल्ला त्यांनी दिला.
माजी आ डॉ सुधीर तांबे म्हणाले की देशाच्या नेतृत्वाची पातळी घसरत चाल लेली आहे त्यामुळे देशासाठी चांगले नेतृ त्व निर्माण करणे गरजेचे आहे आपल्या लोकशाहीचे रक्षण करण्यासाठीआता सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे प्रत्येका च्या मनात निर्भयता येणे गरजेचे आहे मणिपूरच्या घटनतर किती महिला रस्त्या वर आल्या याचा विचार महिलांनी करावा देशाची अर्थवस्था मोजक्या लोकांच्या हातात गेली आहे त्यामुळे हे अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी तसेच धोक्यात आलेली लोकशाही टिकविणे हे आपल्या समोर खूप मोठे आव्हान उभे ठाकले आहे ते पेलण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा आहे प्रेमानंद रुपवते यांनी अनेक निवडणूका लढले मात्र ते यशस्वी झाले नाही ते तत्वाशी कायम एक निष्ठ राहिले त्यांची राहिलेली इच्छा उत्कर्षा पुढे नेईल असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक बहुजन शिक्षण संघाचे अध्यक्ष ऍड संघराज रुपवते यांनी कालकथित दादासाहेब रुपवते व प्रेमानंद रूपवते यांचे राजकीय सामाजिक जीव नाचे विविध पैलू उलगडून सांगितले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला आयोगा च्या सदस्या उत्कर्षाताई रुपवते यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!