श्रीरामपूर (प्रतिनिधी ): – श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने सापळा रचून मेंढ्या, बोकड, शेळयांसह सोयाबीनसह मेंढ्या, बोकड, शेळयां चोरणारी टोळी जेरबंद केली आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या माहीतीनुसार त्यांच्या पथकाने व पोलिस निरिक्षक नितीन देशमुख, पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी सापळा लावून सागर गोरख मांजरे, (वय-२८, रा.मातापूर, ता. श्रीरामपूर), गणेश बाबुराव शिरोळे,( वय-४०, रा. मातापूर) या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांचे साथीदार दिलीप भिमा जाधव,( रा. सायखेडा, ता. निफाड,) योगेश भुराजी भवर, (रा. सायखेडा, ता. निफाड), प्रशांत मुरलीधर धात्रक,( रा. पंचवटी, नाशिक) हे साथीदार असल्याचे तपासात पुढे आले. पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी चौकशी केली असता १९ क्विंटल सोयाबीन (किंमत ६७ हजार ४१०) रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय उंबरगाव शिवारातील शेडमधून १५ मेंढ्या, १ बोकड, १ शेळी चोरल्याचेही आरोपींनी कबूल केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलिस निरिक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.हे.कॉ. संतोष दरेकर, पो.हे.का. सचिन धनाड, पो.ना.रामेश्वर वेताळ, पो. ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे, पो.स.ई. समाधान सोळंके, पो.हे.कॉ. प्रसाद साळवे, पो.कॉ. अजित पटारे, पो.कॉ. संभाजी खरात, पो.कॉ. सचिन दुकळे, पो.कॉ. मच्छिद्र कातखडे, यांनी केली आहे.
मातापुर येथील विजय दिगंबर उंडे यांचे जाळीचे पत्र्याचे शेडमध्ये ठेवलेले एकुण ५३ गोण्या अंदाजे २६ क्विटल सोयाबीन एकुण १,०४,०००/- रु. किं.चे कोणीतरी अज्ञात चोरट्याने जाळीचे कंपाऊडचा दरवाजा तोडुन शेडमध्ये ठेवलेल्या सोयाबीनच्या गोण्या चोरुन नेल्या होत्या त्यावेळी विजय उंडे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दि. २९/१०/२०२५ रोजी गु.र.नं. ९५०/२०२५ भा. न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंद केली आहे.



