16 C
New York
Tuesday, March 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

गणेश कारखाना यशस्वी रित्या गळीत हंगाम पार पाडेल – आमदार श्री बाळासाहेब थोरात

राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्री गणेश सहकारी साखर कारखान्याला ते म्हणतात सहकार्य करू, त्यांना गणेशची काळजी असेल तर त्यांनी गणेशच्या कार्यक्षेत्रातला ऊस नेऊ नये, तो गणेश कारखान्यालाच राहू द्यावा! संजीवनी आणि संगमनेर गणेश चा ऊस नेणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केले.

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या वतीने परिसरातील ऊस उत्पादकांच्या उपस्थितीत ऊस विकास मेळावा आयोजित करण्यात आला होता. साकुरी येथील शिवपार्वती लॉन्स मध्ये झालेल्या या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी संजीवनी चे अध्यक्ष विवेक कोल्हे हे होते.
ऊस ऊसतज्ञ तथा कृषिभूषण संजीव माने, गणेश चे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, ज्येष्ठ संचालक ॲड. नारायणराव कार्ले, शिवाजीराव लहारे, डॉ. एकनाथ गोंदकर, प्रभावती घोगरे, माजी संचालक अशोकराव दंडवते, गंगाधर चौधरी, आप्पासाहेब बोठे, श्रीकांत मापारी, ॲड. पंकज लोंढे, अविनाश दंडवते, विक्रांत दंडवते, अनुप दंडवते, चंद्रभान धनवटे, संगमनेर चे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, गणेश चे कार्यकारी संचालक नितीन भोसले यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्य, ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश कारखाना चांगला चालावा ही सर्वांची मनापासून इच्छा आहे. आपण आपल्या दैनंदिन कामकाजात गणेशच्या बाबत प्राधान्याने चर्चा करतो. गणेशचे अधिकारी कामगार यांच्यात चांगली क्षमता आहे. परंतु गणेश कारखान्याला उसाचा अभाव आहे. गणेशने यापूर्वी पारितोषिक मिळवली आहेत.

गणेशला पुन्हा पूर्वीचे वैभव आणण्यासाठी गणेशच्या कार्यक्षेत्रात ऊस लागवडी वाढणे गरजेचे आहे. पाण्याची कमतरता आहे, काटकसरीने पाण्याचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्यांनी काढले पाहिजे. गणेशचा आसवानी प्रकल्प कॉपरचा आहे.

हा प्रकल्प चांगला आहे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून, जास्त उत्पादन काढले पाहिजे.
गणेशच्या कार्यक्षेत्रातील ऊस गणेश ला पाहिजे. आमदार थोरात पुढे म्हणाले की, त्यांनी गणेशला सहकार्य करण्याची जाहीर केलेले आहे.

त्यामुळे गणेश चा ऊस गणेश राहू द्या, आम्हीही नेणार नाही. गणेश सभासदांनी आमच्या ताब्यात दिला, सभासद, शेतकऱ्यांनी आमच्या प्रयत्नांना साथ द्यायची असेल तर गणेशच्या कार्यक्षेत्रात लागवडी करणे, वाढविणे गरजेचे आहे.

संजीवनी चे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले, गणेशच्या कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांनी गणित चांगला चालावा म्हणून मते दिली, गणेशला ऊसही द्या. आमदार थोरात यांच्यामुळे गणेश कारखान्याला जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज मिळेल. कारखाना आपण चांगल्या प्रकारे चालविणार आहोत.

कोणत्याही शक्तीने ऊसाला आडकाठी आणली तरी आपल्याला सव्वातीन लाख टन ऊस गाळप करावयाचे आहे. गणेशच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कारखान्याकडे उचलून ती कराव्यात, गणेशच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी सभासद व्यवस्थापनाच्या मागे उभे आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. असेही श्री. कोल्हे म्हणाले.

यावेळी ऊस तज्ञ संजीव माने यांचेही शेतकऱ्यांना मार्गदर्शनठरणारे भाषण झाले. प्रास्ताविक गणेशा अध्यक्ष सुधीर लहारे यांनी केले. तर आभार उपाध्यक्ष विजय दंडवते यांनी मानले.
याप्रसंगी ज्येष्ठ संचालक भगवानराव टिळेकर, बाबासाहेब डांगे, सौ. शोभाताई गोंदकर, मधुकर सातव, संपतराव चौधरी, नानासाहेब नळे, महेंद्र गोर्डे, बाळासाहेब चोळके, संपतराव हिंगे, गंगाधर डांगे, अनिलराव गाढवे, अरुंधती फोपसे, कमलबाई धनवटे, विष्णुपंत शेळके, आलेश कापसे, यांच्यासह अभिजीत दंडवते, गणेश शेळके, संजय जेजुरकर, बबलू लहारे, पुंडलिकराव चोळके, सूर्यभान गोर्डे, भिकाजी घोरपडे, दत्तात्रय गुंजाळ, भीमराज लहारे, राजेंद्र लहारे
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!