गोगलगाव(जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील गिते –सोसे वस्तीवर (पांढरी वस्ती) भाऊसाहेब रखमा खाडे यांच्या गट नंबर ७९ मध्ये बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग व प्राणीमित्र यांना यश आले.
गेल्या महिन्यापासून गोगलगांवात धुमाकूळ घालणारा बिबट्या कोंबडीच्या सावजाला आकर्षून पिंजऱ्यात जेरबंद झाला. चार पाच दिवसापासून हा बिबट्या पिंजऱ्या भोवती फिरत होता पण पिंजऱ्यात जात नव्हता परंतु काल बुधवार दि. १४ रोजी बिबट्याच्याच पिंजऱ्यात ठेवलेल्या कोंबडीला आकर्षून तो अलगत जेरबंद झाला.
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक प्रतिक गजेवर व प्राणीमित्र विकास म्हस्के घटना स्थळी पोहचले व सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी गणेश मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख यांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच वनरक्षक प्रतिक गजेवर, प्राणीमित्र विकास म्हस्के, आपत्कालीन समितीचे अनिल जाधव, मंडू खेमनर हे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला जेरबंद बिबट्या हलविण्याची कार्यवाही केली.
जेरबंद झालेला बिबट्या हा चार वर्षं वयाचा नर जातीचा होता. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर बिबट्या पाहण्यासाठी परिसरातून खुप लोकं जमा झाली होती. या गर्दीला पांगवण्यासाठी सरपंच भाऊसाहेब खाडे, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामप्रसाद मगर,अनिल सोसे, प्रशांत सोसे, सुरेश गिते , राहुल चौधरी, सौरभ चौधरी, गणेश गुजर, पुंजा सातकर मदत केली.
हा एक बिबट्या जरी पकडला तरी अजुन दोन बिबटे परिसरात आहे तरी कृपया याच भागात परत पिंजरा लावावा अशी मागणी गोगलगाव ग्रामस्थांनी केली.



